प्रधानमंत्री मुद्रा योजना पूर्ववत सुरु करा. [सुनील मांजरे यांचे केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकुर यांना निवेदन.]

youtube

प्रधानमंत्री मुद्रा योजना पूर्ववत सुरु करा.

[सुनील मांजरे यांचे केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकुर यांना निवेदन.]

*ढाणकी /प्रतिनिधी :*

सुशिक्षित युवा बेरोजगारांना व्यवसाय उभारणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ ही क्रांतिकारी योजना संबंध देशभरात सुरू केली.सुरुवातीच्या काळात या योजनेचा बऱ्याच युवकांना लाभ झाला.या योजनेमार्फत त्यांच्या व्यवसायाला बळकटी आली.पण अलीकडील काळात ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात बंद असल्याचे लक्षात आले.कारण या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करताच
sorry ! currently the e – mudra facility is not available in your state. असा मेसेज येत आहे.म्हणजे ही योजना महाराष्ट्रात सध्या तरी बंद असल्याचेच जाणवते. ह्याच गोष्टीची दखल घेत ढाणकी भाजपचे शक्ति केंद्रप्रमुख तथा सोशल मीडिया प्रमुख सुनील मांजरे यांनी, काल उमरखेड येथे हिंगोली लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आलेले, केंद्रीय राज्यमंत्री बंदरे व जलमार्गमंत्री शंतनू ठाकूर यांना निवेदन देऊन, महाराष्ट्रात ही योजना लवकरात लवकर सुरू व्हावी याकरिता, आपण वरिष्ठ स्तरावर केंद्राच्या लक्षात ही बाब आणून द्यावी अशी चर्चा केली. यावर मंत्री महोदयांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत, मी ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून देईल असे आश्वासन दिले.
तसेच नमो महाराष्ट्र वृत्तपत्राच्या महिला पत्रकार सविता चंद्रे यांनी महिलांच्या प्रश्नांना, उज्वला योजने च्या जागृती बद्दल सुध्दा मंत्र्यांचे लक्ष वेधले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!