घमापूर ते बोरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांना.

youtube

घमापूर ते बोरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड येथे निवेदन
उमरखेड …जि.प.बांधकाम
उपविभाग येथे
घमापूर पासून बोरगाव, डोंगरगाव, भवानी, खेडी, सोईट, वालतूर, घडोळी जाणारा रस्ता हा जवळपास दहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
घमापूर ते बोरगाव रस्त्यावरील पुलांची देखील अवस्था फार बिकट झाली आहे. रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तडफदार युवक तालुका अध्यक्ष बबलूभाऊ जाधव, शहर अध्यक्ष संतोष भाऊ सुर्यवंशी, गुणवंत दादा तसेच बोरगाव येथील सरपंच प्रेमराव आढाव, उपसरपंच कृष्णा इमडे व बोरगाव येथील असंख्य लोक उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “घमापूर ते बोरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!