राष्ट्रीय ओबीसी मोर्चा च्या भारत बंदला उमरखेड मध्ये प्रतिसाद

youtube

राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, च्या भारत बंद ला उमरखेड मध्ये प्रतिसाद.

 

उमरखेड

दि.22 मे 2022 रोजी राष्ट्रिय पिछडा वर्ग मोर्चा म्हणजेच ओबीसी मोर्चा द्वारे चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी भारत बंद आंदोलनाला देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
त्याअंतर्गत,
उमरखेड तालुक्यातील बामसेफ प्रणित राष्ट्रीय ओबीसी मोर्चा द्वारे उमरखेड बंद चे आव्हान करण्यात आले होते.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,जुनी पेन्शन लागू करावी,शेतकऱ्यांना हमीभाव देणारा कायदा लागू करावा,CAA,NRC,NPR कायदा रद्द करावा, पर्यावरण रक्षणाच्या नावावर सुरू असलेले आदिवासींचे विस्थापना विरोधात,निवडणुकीमध्ये EVM वापर करण्या विरोधात, कोरोना काळात पारित केलेल्या मजूर विरोधी कायद्या विरोधात,जबरदस्ती च्या कोरोना लसीकरणाच्या विरोधात, यांसह अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना घेऊन, भारतीय विद्यार्थी मोर्चा दक्षिण भारत प्रभारी विद्वान केवटे यांच्या नेतृत्वात व वर्षा शिवाजीराव देवसरकर यांच्या सह नेतृत्वात उमरखेड बंद चे आव्हान करण्यात आले होते.

उमरखेड शहरात सकाळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून,मोठ्या संख्येने बाईक रॅली काढूत, व्यापारी आणि व्यावसायिकांना बंद चे आवाहन केले.
मुख्य बाजारपेठे सह नांदेड रोड मार्केट, ढानकी रोड मार्केट, महागाव रोड मार्केट ची व्यापारी संकुले संमिश्र प्रमाणात बंद दिसत होती.

या बंद मध्ये राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छञपती क्रांती सेना, राष्ट्रीय गोर बंजारा क्रांति संघ,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क,बहुजन मुक्ति पार्टी,सकल ओबीसी समाज संघटना,भारतीय विद्यार्थी मोर्चा,राष्ट्रीय किसान मोर्चा,पुरोगमी युवा ब्रिगेड,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ यांसह अनेक ओबीसी संघटनांनी मोठ्या प्रमाणत समर्थन व सहभाग दर्शविला.
यावेळी वर्षा शिवाजीराव देवसरकर,पुंडलिक तलवारे,विजय पोंगाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करित या रॅली ची सांगता करण्यात आली.कायदा,सुव्यवस्था पाळत,शांततेत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण बाजारपेठेत काल ओबसी जनगणाना हा चर्चेचा विषय ठरला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!