आरटीओचा खेळखंडोबा उमरखेड शिबिरात लर्निंग लायसन्सवर अघोषित बंदी, नागरिक हैराण उमरखेड

आरटीओचा खेळखंडोबा
उमरखेड शिबिरात लर्निंग लायसन्सवर अघोषित बंदी, नागरिक हैराण
उमरखेड – उमरखेड येथील आरटीओ शिबिरामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून शिकाऊ लायसन्स (Learning Licence) प्रक्रियेला अघोषित ब्रेक लागला असून, नागरिकांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे. कोणतीही अधिकृत माहिती दिली न जाता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांकडून लायसन्स प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली आहे, आणि या सगळ्याची जबाबदारी थेट त्यांच्या वरिष्ठांवर ढकलली जात आहे.
१३ जून रोजी उमरखेडच्या विश्रामगृहात आरटीओ शिबिर भरवण्यात आले होते. शेकडो नागरिक ऑनलाईन अर्ज करून वेळेवर शिबिरस्थळी पोहोचले. मात्र, “अपॉइंटमेंट फिक्स नाही” किंवा “तांत्रिक अडचण आहे” अशा कारणांवर त्यांचे अर्ज थेट नाकारण्यात आले. काहींना जुने लायसन्स असल्यावर नवीन वाहनाचे लायसन्स ऍड (इंडॉसमेंट) करायचे होते, तरीदेखील त्यांना सुरुवातीला परत पाठवण्यात आले.
थोड्यावेळाने परिस्थिती बदलली – बायोमेट्रिकची गरज आहे असं सांगून काहींचे अर्ज घेतले गेले. मग प्रश्न हा की – जर तांत्रिक अडचण असेल तर काही अर्ज स्वीकारलेच कसे गेले?
या सगळ्यामागे मे महिन्यात पुसद येथे आरटीओ अधिकाऱ्यांवर पडलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीनंतरचा प्रभाव दिसतो आहे. त्या घटनेनंतर आरटीओ कर्मचाऱ्यांनी थेट कामच टाळण्याचे धोरण स्वीकारल्याचे चित्र उमरखेडमध्ये स्पष्ट दिसून येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिबिरातून लर्निंग लायसन्स प्रक्रियाच थांबवण्याचे मौखिक आदेश दिले असल्याचे निरीक्षकांनी सांगितले.
यामुळे यवतमाळ किंवा इतर जिल्ह्यात जाऊन लायसन्स प्रक्रिया पूर्ण करावी लागते आहे, जे सर्वसामान्यांसाठी वेळखाऊ, खर्चिक आणि त्रासदायक ठरत आहे.
याहून दुर्दैवी बाब म्हणजे या अडचणींविषयी उमरखेडमधील कुठलाही लोकप्रतिनिधी तोंड उघडताना दिसत नाही. नागरिकांचे हाल सुरू असतानाही कोणीही प्रश्न विचारायला तयार नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.
चौकट:
“लायसन्सवर इंडॉसमेंटसाठी तांत्रिक अडचणी” – विजयकुमार लोखंडे
“ज्यांच्याकडे आधीचे लायसन्स आहे व इतर वाहनासाठी इंडॉसमेंट करायचा आहे, त्यांच्यासाठी बायोमेट्रिक गरजेचे आहे. शिबिरात तांत्रिक अडचणी आहेत व वरिष्ठांच्या आदेशाने नवीन लर्निंग लायसन्स प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे.”
— विजयकुमार लोखंडे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक
—
नागरिकांची ठाम मागणी:
लर्निंग लायसन्ससह इतर प्रक्रिया पूर्ववत सुरळीत सुरू कराव्यात, आणि शिबिरात उपस्थित झालेल्या प्रत्येक पात्र अर्जदारांना सेवा द्यावी. अन्यथा जनतेचा रोष अधिक तीव्र होईल.
boru su kaçağı tespiti Yeniköy su kaçağı tespiti: Yeniköy’de su kaçağını modern yöntemlerle tespit ediyoruz. https://carolinahurricanesclub.com/read-blog/5577
Barbaros su kaçak tespiti Gizli su kaçakları küf oluşumu ve sağlık riskleri yaratabilir. https://laziofansclub.com/read-blog/4438
Cihangir su kaçak tespiti Su kaçağı sorunumu kırmadan hallettikleri için çok memnunum. https://mypungi.com/read-blog/27381