संजय राउत यांची ट्रांनीट जमानतीया अर्ज नामंजूर.
संजय राउत यांची ट्रांनीट जमानतीया अर्ज नामंजूर – नितीन भुतडा
उमरखेड –
देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी यांचे बाबत संजय राजाराम राउत यांनी सामना या वृत्तपत्रातून प्रयोभक देश विरोधी विधान केले होते. सदरच्या विधानाला आहत होवून यवतमाळ वाशिम लोकसभेने भारतीय जनता पार्टीचे समन्वयक नितीन सुरेशचंद्रजी भुतडा रा.उमरखेड यांनी दिनांक ११/१२/२०२३ रोजी सामनाचे संपादक खासदार संजय राउत यांचे विरुष्द लेखी फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन उमरखेड पोलीस स्टेशन यांनी कलम १५३/अ. ५०५/२ व १२४/अ भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंद केला होता. सदरचा गुन्हा नोंद झाल्यानंतर संजय राउत यांनी पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जमानत मिळणे करीता अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तपासा दरम्यान सदर गुन्हा हा मूळ केस पेपरसह दादर पश्चिम मुंबई पोलीस स्टेशनला वर्ग केल्या बाबत तसेच सदर गुन्हयातून कलम १२४/अ वगळण्यात आल्या बाबत म्हणणे सरकारी पक्षाव्दारे वि.न्यायालयात ठेवण्यात आले. सदरचा गुन्हा हा दादर पश्चिम येथे वर्ग केला असल्याने खासदार संजय राउत यांनी वि.न्यायालयात ट्रांजीट बेल मिळणे करिता अर्ज दाखल केला होता. सदरच्या अर्जावर सरकारी पक्षाव्दारे श्री अॅड. मनोज कृष्णराव काळेश्वरकर यांनी आक्षेप दाखल केला. तसेच तकारदार नितीनजी भुतडा यांचे वतीने अॅड. आदित्य मा.माने यांनी आक्षेप दाखल केला. व वि.न्यायालयात प्रखरपणे युक्तीवाद करुन मा सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. त्या वरुन वि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती मखरे मॅडम पुसद यांनी संजय राउत यांचा ट्रॉजीट बेलचा अर्ज नामंजूर केला आहे.