शांततेचा संकल्प – समाजहितासाठी एकजूट अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; उत्सव साधेपणात व सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचा निर्धार उमरखेड :

youtube

शांततेचा संकल्प – समाजहितासाठी एकजूट

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; उत्सव साधेपणात व सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचा निर्धार

उमरखेड :
तालुका व महागाव परिसरातील अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ८५ गणेश मंडळांनी गणेश उत्सव शांततेत, साधेपणात व सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचा संकल्प केला.

या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष मनुन आमदार किसन वानखेडे,पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिक्षक हनुमंत गायकवाड ,उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर,माजी आमदार नामदेव ससाणे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, ठाणेदार शंकर पांचाळ,मुख्याधिकारी महेश जामनोर, गटविकास अधिकारी किरण कोळपे, चिंतागराव कदम, प्रकाश दुधेवार,ठाणेदार पंकज दाभाडे , पो.नि.निळे ,पो.नि. पाडुरंग शिंदे ,तालुक्यातील पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, मुस्लिम बांधव, महिला, पत्रकार आणि शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले.
*कुमार चिंता यांनी ५१ हजारांची मदत जाहीर केली*
*पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी २१ हजार मदत जाहीर केली*
*माळीपुरा गणेश मंडळाकडून ११ हजारांची मदत जाहीर*

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार शंकर पांचाळ यांनी केले, सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी केले.
बैठकीत सर्वांनी मिळून एकच संदेश दिला :
“एकमेकांचा आदर राखूया, शांततेत आणि उत्साहात सण साजरा करूया,

Google Ad
Google Ad

2 thoughts on “शांततेचा संकल्प – समाजहितासाठी एकजूट अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; उत्सव साधेपणात व सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचा निर्धार उमरखेड :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!