सहस्त्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्पासंदर्भात आमदार किसनराव वानखेडे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना

youtube

सहस्त्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्पासंदर्भात आमदार किसनराव वानखेडे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना

उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत एक महत्त्वपूर्ण प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला. सदर सूचना सहस्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्पाच्या मंजुरी व प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या स्थितीशी संबंधित होती.

या प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी शासनाचे लक्ष खालील मुद्द्यांकडे वेधले:

1. – सहस्रकुंड प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव — राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांच्याकडून हा सुधारित प्रस्ताव शासनास नेमका कधीपर्यंत सादर केला जाईल, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

2.- प्रशासकीय मान्यता — सुधारित प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता कधीपर्यंत मिळणार आहे, याविषयी त्यांनी स्पष्टता मागितली.

3. – प्रकल्प सुरू व पूर्ण होण्याची वेळ — सिंचन, वीज उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या प्रकल्पाच्या कार्य सुरूवातीची व पूर्णतेची अचूक कालमर्यादा काय असेल, हे शासनाने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव व नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, माहुर व किनवट या तालुक्यातील परिसरात सिंचनाची सोय, पिण्याचे पाणी आणि वीज उपलब्ध होणार असून, हजारो शेतकरी व नागरिकांना थेट फायदा होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची कार्यवाही जलदगतीने व्हावी, अशी आग्रही मागणी आमदार किसनराव वानखेडे यांनी सभागृहात केली.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “सहस्त्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्पासंदर्भात आमदार किसनराव वानखेडे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!