उमरखेड येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
उमरखेड येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
उमरखेड प्रतिनिधी :
संकटाच्या काळात शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये शिवसेनेत मोठे झालेल्यांना आपल्या गावात आपल्या वस्त्यांमध्ये फिरू देऊ नका असे आवाहन माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी शिवसैनिकांना केली ते उमरखेड येथे आयोजित शिवसैनिक आढावा बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
येथील राजस्थानी भवन येथे दिनांक ६ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली
बैठकीत सर्व उमरखेड -महागाव मतदार संघातील सैनिकांनी उपस्थीती दाखवुन आम्ही बाळासाहेबाचे आणि उध्दव ठाकरें चे शिवसैनिक असल्याची पावती दिली .कार्यकर्ता आढावा बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार सुभाषराव वानखेडे होते तर प्रमुख उपस्थीतीत जिल्हा प्रमुख पराग पिंगळे , संतोष ढवळे, प्रा . मोहन मोरे, डॉ विश्वनाथ विणकरे, सौ निर्मला विनकरे, प्रविण शिदे , विशाल पांडे हे उपस्थीत होते .
यावेळी बोलतांना प्रा मोहन मोरे यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असे सांगितले व जिल्हा प्रमुख पराग पिंगळे ‘ संतोष ढवळे यांनी बंडखोर शिंदे गटात सामील झालेल्या आमदार खासदारांचा खरपुस समाचार घेतांना एक निष्ठेने सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहण्याचे आवाहन केले त्याला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला .
माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना मी उद्धव ठाकरे यांच्या संकट काळात . परत आलो आहे तसेच भाजपवरती हल्लाबोल करीत भाजपाने आम्हाला हिंदुत्वाची शिकवन देऊ नये तसेच शेतकरी विषयी, वाढती महागाई ,बेरोजगारी विषयी बोलुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला गॅस योजनेची फज्जा उडविली व कार्यकर्त्यांना प्रत्येक गावामध्ये जा आणि गावातील प्रत्येक युवकास शिवसेनेत सामावून घ्या आणि पक्ष वाढवा व व बंडखोरांवरती हल्ला करीत विदर्भातील गबरू व वाशिमकडील बॉबकट वाली झिपरी आणि नोटबंदी कालावधीत टक्केवारी घेऊन कोट्यावधी रुपयाचा बँकेचा घोटाळा करणारा हेम्या आणि मगरमच्या आसू रडणारा संतोष या गद्दार आणि बंडखोरी करणाऱ्यानी आम्हाला हिंदुत्वाची भाषा शिकवू नये हल्लाबोल वक्तव्य केले .
या आढावा बैठकीत 53 युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला .
आढावा बैठकी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नाईक यांनी केले तर प्रास्ताविक चितांगराव कदम यांनी केले या वेळेस उपजिल्हा संघटक राजेश खामनेकर ,एडवोकेट बळीराम मुटकुळे ,शहर प्रमुख संदीप ठाकरे , शाखा भरवाडे, निलेश जैन ,प्रशांत पत्तेवार ,गजेंद्र ठाकरे, अमोल तीवरंकर, रेखा भरणे ,,सविताताई कदम ,अनिल नरवाडे ,दत्ता कदम ,तेजस नरवाडे, सुरेश देशमुख अदी विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी युवा सैनिक, शिवसैनिक ,महिला आघाडी, अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आढावा बैठकीस उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य मोहनराव मोरे यांनी केले .