नैसर्गिक नाल्याचे पाणी थांबवा अन्यथा 15 ऑगस्ट तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहन करणार – गजानन महाजन कदम.

youtube

नैसर्गिक नाल्याचे पाणी थांबवा अन्यथा 15 ऑगस्ट तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहन करणार – गजानन महाजन कदम

 

हदगाव – गजानन जिदेवार
डोंगरगाव रोड हदगाव येथील कदम नगरचे नैसर्गिक नाल्याचे घाण पाणी थांबवा अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहन करण्याचा इशारा गजानन महाजन यांनी एका निवेदनाद्वारे दिला असून निवेदनास नैसर्गिक नाल्याचे पाणी घराच्या बाजूने नाला हा नकाशाप्रमाणे आसताना तो नाला बंद केल्याने नैसर्गिक पाणी गजानन महाजन यांच्या घराच्या चारही बाजूंनी पाण्याने वेडा घातला व रोडवरून दोन ते तीन फूट घरांच्या समोरून घाण पाणी वाहत आहे .गजानन महाजन यांना सदर नाल्याच्या घाण पाण्याचा खूप त्रास होत असल्याने गजानन महाजन यांनी नगरपालिकाचे मुख्याधिकारी यांना प्रथम अर्ज 17 जानेवारीला तर दुसरा अर्ज 20 जानेवारी व तिसरा अर्ज 9 फेब्रुवारी आणि चौथा अर्ज हा 27 जुलै रोजी अर्ज देऊन रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी नगरपालिका हदगावचे मुख्याधिकारी यांनी यावर काहीही उपाययोजना करताना दिसून येत नाही डोंगरगाव रोडवर येत असलेल्या नाल्याचा नैसर्गिक स्त्रोत्र पाणी वाहण्यासाठी मोकळा करून कदम नगर डोंगरगाव रोडवरील नागरिकांना होणारा त्रास वाचवावा अन्यथा 15 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदन करणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले दोन दिवसात पाणी जाण्यासाठी नाला काढून देण्याची आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेतला परंतु दिनांक 3/ 8 /2022 पर्यंत कोणत्याही प्रकारे नाल्याचा पाणी जाण्यासाठी उपाययोजना केलेली नसून येत नाही वरचेवर विनंती अर्ज देऊनही नगरपालिकेला ही शेवटची विनंती केली जर येथे 14 ऑगस्ट 2022 पर्यंत सदरील नाल्याचे पाणी नैसर्गिक नियमानुसार व नकाशा प्रमाणे नाला काढून पाणी काढून दिले नाही तर स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदन आत्मदहन करणार असल्याचे गजानन महाजन हे करणार असल्याने आता तरी काही साम्राज्य पसरली ते बंद होईल की आत्मदान करेपर्यंत प्रशासन गप्प राहील हे मात्र येणारा काळच ठरवेल… मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सोमवार पर्यंत त्याचे पूर्ण काय ते करू असे आश्वासन दिले आहे..

 

 


*ढाणकी येथील मनोरूग महिला ला सि.ओ.माधुरी मडावी व सविता चंद्रे यांच्या मदतीने मिळाले नंददीप फाऊंडेशन आधार*
आज मनोरूग महिला एकदम ठणठणीत आहे.
*सि.ओ.माधुरी मडावी यांची प्रतिक्रिया*
*नारिशक्ती न्युज चँनल वर*

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!