धक्कादायक घटना प्रियसीने प्रियकराच्या तोंडात कोंबल्या 26 गोळ्या आलुपँथिच्या ढाणकी

youtube

धक्कादायक घटना प्रियसीने प्रियकराच्या तोंडात कोंबल्या 26 गोळ्या आलुपँथिच्या

ढाणकी

ढाणकी शहरातील एका महिलाने ‘ अविनाश दत्ता गडदे वय २६ रा. ढाणकी यांचे गेल्या पाच-सहा महिन्यापासून दोघांचे एकमेकांच्या संमतीने संबंध होते.सदर युवकाचे तिच्या घरी नेहमी येणे जाणे होते. दरम्यान याच काळात ‘छाया’ हिने ब्लॅकमेल करत सदर युवकाकडून ८० हजार रुपये घेतले. तसेच दिनांक २७ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरी बोलावून पुन्हा खिशातील १६ हजार रुपये काढून घेतले. आणि चपलेने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्याचवेळी ‘सदर महिला ‘ हिच्या आईने गळा दाबला. गळा दाबल्यानंतर तोंड उघडताच त्या महिलिने तिच्या घरी असलेल्या, ऍलोपॅथीच्या २० ते २५ गोळ्या सदर युवकाच्या तोंडात कोंबल्या व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत कसेबसे करून सदर युवक दोघींच्या तावडीतून सुटून पळत हैदर अली चौकाकडे गेला असता,दोघींनी त्याचा पाठलाग करीत हैदर अली चौकात त्यास गाठून चपलेने मारहाण केली. तिच्या आईने पायावर दगड फेकून मारला. व माझ्याशी संबंध तोडायचे असतील तर २ लाख रुपये दे अशी धमकी दिली.
अशा आशयाची तक्रार बिटरगाव पोलीस स्टेशन येथे ढाणकी येथील अविनाश दत्ता गडदे वय २६ या युवकाने दिली.
सदरचे बयान पो.हेकॉ./१६४९ रोशन सरनाईक यांनी मा.वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र ढाणकी यांचे समक्ष व दोन पंचा समक्ष घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी पीडित अविनाश याचे मृत्यूपूर्व जबानीवरुन महिलेविरुद्ध भारतीय न्यायसंहिताच्या कलम १०९, ३०९(४),३०८(२),३२६ (२),१२५,११५(२), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.
पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी करीत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!