मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांचे पाण्याच्या टाक्यावर चढून शोले आंदोलन जिल्हाधिकारी यांची उपोषण मंडपास भेट.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांचे
पाण्याच्या टाक्यावर चढून शोले आंदोलन
जिल्हाधिकारी यांची उपोषण मंडपास भेट.
आंदोलनला रोज वेगळे वळण येत असल्याने प्रशासनाची तारांबळ .
उमरखेड :- दि. १३
मागील नऊ दिवसापासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषण मंडपाला पाठिंबा देण्यासाठी दररोज तालुक्यातील दहा ते बारा गावातील गावकरी पाठिंबा दर्शवीत आहेत बुधवार रोजी दुपारी २ वाजता आरक्षणाची मागणी घेऊन दोन मराठा तरुणांनी येथील पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले त्यामुळे येथील आंदोलनाला दिवसेंदिवस वेगळे वळण घेत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे .
. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठा समाजाच्या पाच युवकांनी लोकशाही मार्गाने दि 5 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे . परंतु
काल तालुक्यातील जेवली येथील अशोक देवराव जाधव हा 35 वर्षीय युवक उपोषणकर्त्यांना बोलण्यासाठी मंडपात गेला व आरक्षणाची मागणी करत त्याच ठिकाणी बसून त्याने खिशातली कीटकनाशकाची बॉटल काढून विष प्राशन केले तर आज दि 13 सष्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यवतमाळ हे उपोषण मंडपी भेट देण्यासाठी येत असल्याचे कळाले असता प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी येथील दोन तरुण पवन सूर्यवंशी , संजय बिजोरे पाटील यांनी शोले स्टाईल आंदोलन करीत असल्यामुळे काही काळ प्रशासनाची तारांबळ उडाली होती मात्र नंतर तहसिलदार यांनी शासनाला आरक्षणासंदर्भात जे लेखी पत्र दिले त्यांची प्रत आंदोलन कर्त्याना दिल्याने आंदोलकांनी शोले आंदोलन मागे घेतले.
तालुक्यातील सकल मराठा समाजातील तरुण दररोज आंदोलनाला वेगवेगळे स्वरूप देत असून सदर घडणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून सदर घटनेने मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसत असुन शासनाने त्वरीत निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे .
चौकट
जिल्हाधिकारी यांची उपोषणास भेट
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी बुधवार रोजी उपोषण मंडपास भेट देऊन उपोषण कर्त्यांच्या प्रकृत्तीची आस्थेने चौकशी केली व प्रशासन आपल्या सोबत असल्याचे सांगितले यावेळी उपोषण कर्त्यांनी मराठवाडयाच्या धर्तीवर उमरखेड , महागांव व पुसद या तीन तालुक्याचा समावेश करुन मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले सरसगट दाखले देण्याची मागणी केली.
चौकट ॥
आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी उमरखेड ढाणकी राज्यमार्गावर धानोरा (सा) फाटा येथे शेकडो मराठा बांधवांनी सकल दिड तास रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले .
त्यातच आज उपोषण मंडपी भेट देण्यासाठी तालुक्यातील मुळावा, वानेगांव पार्डी, हातला ,तरोडा , देवसरी , बाळदी ,झाडगाव तिवरंग आदी गावाने पाठिंबा दर्शविला त्यामुळे येथील आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होत आहे त्यामुळे दररोज आंदोलनाला वेगळेच वळण येत आहे .