सकल मराठा समाज उपोषणाला आमदार ससाने यांची भेट. मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्या सोबत चर्चा करणार.

सकल मराठा समाज उपोषणाला आमदार ससाने यांची भेट.
मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्या सोबत चर्चा करणार
उमरखेड : – दि. ७.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी ५ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणास बसलेल्या सचीन घाडगे , गोपाल कलाने , शिवाजी पवार , सुदर्शन जाधव यांची उपोषण मंडपात जाऊन आमदार नामदेव ससाने यांनी भेट घेतली असून आरक्षणास पाठिंबा असल्याचे सांगितले सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .
मराठवाड्यातील नऊ जिल्हयातील सकल मराठा समाजाचा अहवाल राज्य शासनाने मागविला असल्याचे उपोषण कर्त्यानी सांगितले यामुळे विदर्भातील मराठा समाजावर अन्याय होईल तेव्हा महाराष्ट्रातील सरसगट सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण शासन दरबारी हा प्रश्न प्राधान्याने मांडावा असे उपोषण कर्त्यांनी आमदार ससाने यांना सांगितले तेव्हा आमदार ससाने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे सोबत तात्काळ मुंबई जावून सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगून मराठा आरक्षणामध्ये विदर्भावर अन्याय होणार नाही असे सांगितले .
यावेळी उपोषण मंडपात गुणवंत सुर्यवंशी , सरोज देशमुख , स्वप्निल कनवाळे , प्रविण सुर्यवंशी, गजानन कदम, गजानन वाघमारे, यांचे सह मोठया प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते.
चौकट
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या व इतर मागण्या संदर्भात चार युवकांचे तहसिलच्या प्रांगणात बेमुद्त उपोषण सुरू असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. शहरी व ग्रामीण भागातून जनतेचा उपोषणास पाठिंबा वाढत असून अनेक सामाजिक संघटना व राजकिय पक्षाने उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे