पिडीत मुलीचा फोटो व्हायरल करणे सामजिक कार्यकर्ता महिलेला महागात पडले साईली शिंदे यांना अटक.
पिडीत मुलीचा फोटो व्हायरल करणे सामजिक कार्यकर्ता महिलेला महागात पडले
साईली शिंदे यांना अटक
उमरखेड : –
अत्याचार पिडीत अल्पवयिन 18 वर्षाखालील मुलीचे नाव अथवा तिला पाहुन लोक ओळखतील असे फोटो समाज माध्यमातून प्रसारित करणे कायद्याने गुन्हा ठरेल असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतांना सायली शिंदे समर्थक नावाच्या मोबाईल क्रमांकावरून दि 10 ऑक्टोंबर रोजी पोफाळी पो स्टे अंतर्गत घडलेल्या अल्पवयिन शाळकरी मुलीवर अमानविय कृत्याने समाजमन हळहळले असतांना उमरखेड विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याच्या अविर्भावात मतदार संघात नव्यानेच दाखल झालेल्या साईली शिंदे समर्थक न्यूज रिपोर्टर लखन जाधव यांच्या व्हाटस् अॅप गृपवर दि 13 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास 95 11 26 62 40 या मोबाईल क्रमांकावरून पिडीतेचा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल केला . या प्रकरणी उमरखेड पोलीसांनी लक्ष्मीकांत बालाजी मैड यांच्या तक्रारीवरून विधानसभेच्या इच्छुक उमेदवार साईली शिंदे यांचे विरुद्ध भादंवि 228 ( A ), 500, 23 , 23 (4) पोक्सो 66 ( E ) IT अॅक्ट नुसार उमरखेड पोलीसांनी गुन्हा दाखल करून सायली शिंदे यांना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल राठोड करीत आहे .