ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष पदी शिला कदम यांची निवड व पदग्रहण सोहळा संपन्न.

youtube

ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष पदी शिला कदम यांची निवड व पदग्रहण सोहळा संपन्न

उमरखेड
शहरातील विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा ईनर व्हिल क्लबचा पदग्रहण सोहळा 3 जुलै रविवारी रोजी जिजाऊभवन येथे पार पडला.मागील कार्यकारणी निरोप समारंभ , नूतन कार्य करणाऱ्याचा पदग्रहण सोहळा पार पडला. 2022-23 च्या अध्यक्ष पदी शीलाताई कदम, सेक्रेटरी पदी उषा तास्के, ट्रेझर पदी रोहिणी झरकर, आय एस ओ कविता गंगासागर, सी .सी पदी प्रतिमा मालपे यांनी पदभार स्वीकारला. मावळत्या अध्यक्षा मनिषा काळेश्वरकर यांनी त्यांचे काळातील सर्व अहवाल सदस्य समोर मांडला व अध्यक्षपदी निवड झालेल्या शीला कदम यांना कॉलर वित्त प्रदान करुन पदभार दिला.
या कार्यक्रमाला चार्टर प्रेसिडेंट डॉ. राऊत मँडम, रोटरीन डाँ या. मा. राऊत, अँड विलासराव देवसरकर, गिरी सर ,गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, रोटरियन संदीप अग्रवाल, गावंडे कॉलेजचे प्राचार्य कदम उपस्थित होते. सर्व मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .यावर्षी नवीन 9 सदस्य जोडल्या गेल्या या सदस्यांना चार्टर प्रेसिडेंट डॉ राऊत मॅडम यांनी शपथ दिली. या कार्यक्रमांला गिरी मँडम सर्व सदस्य व सविता चंद्रे पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन सेक्रेटरी उषा तासके व आभार प्रीती धामणकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Google Ad
Google Ad

1 thought on “ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष पदी शिला कदम यांची निवड व पदग्रहण सोहळा संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!