पळसा येथील मॅरेथान स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद.

youtube

पळसा येथील मॅरेथान स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

पळसा – सविता चंद्रे

येथे ग्रामदैवत बिरोबा महाराज यात्रेनिमीत्य मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सपन्न झालेल्या मॅरेथान स्पर्धेत बक्षीसे सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान ठेवण्यात आला असल्याने हदगांव तालुक्यासह बाहेरील स्पर्धेकानी सहभाग घेतला. मॅरेथान स्पर्धेला स्पर्धेकासह प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उस्फूर्त प्रतिसाद दिला .
स्पर्धेचे उदघाटन मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी.भिसे उपस्थित होते.यावेळी यावेळी सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव , माजी सरपंच प्रतिनिधी रणजित कांबळे , बिट जमादार श्याम वडजे , डॉ. निळे , चक्रवर्ती अशोक विद्यालयाचे शिक्षक मुंजाजी काकडे ,पोलीस पाटील पवार अंबाळकर ,डॉ गंगासागर, डॉ. गजानन कदम,डॉ.पिराजी पवार, ,कामाजी निमडगे , सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा मुळावकर, बिरोबा मस्के, ब्रम्हानंद वाणी, विशाल कांबळे, सुरज निमडगे, प्रफुल्ल मस्के,रणजित मुळे,ञानेश्वर हाराळे, अमोल मस्के गोपाल जाधव ,गजानन अंकुशराव मस्के ,तुकाराम यांनी परीश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

1 thought on “पळसा येथील मॅरेथान स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद.

  1. This entrance is phenomenal. The splendid substance displays the maker’s dedication. I’m overwhelmed and anticipate more such astonishing sections.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!