स्टेट बँक ऑफ इंडिया, उमरखेड शाखेतर्फे ‘संवाद 2025 नयी दिशा नया विश्वास’ व्यावसायिक मेळाव्याचे यशस्वी आयोजन

स्टेट बँक ऑफ इंडिया, उमरखेड शाखेतर्फे ‘संवाद 2025 नयी दिशा नया विश्वास’ व्यावसायिक मेळाव्याचे यशस्वी आयोजन
उमरखेड – 15 जुलै
स्टेट बँक ऑफ इंडिया, उमरखेड शाखेच्या वतीने ‘संवाद 2025 नयी दिशा नया विश्वास या व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन 15 जुलै 2025 रोजी राजस्थान भवन, उमरखेड येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक व्यापारी, व्यावसायिक व ग्राहकांशी थेट संवाद साधणे व आर्थिक विकासाच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
सर्वप्रथम शाखाप्रबंधक प्रदीप फटिंग यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशांत एकुडे क्षेत्रीय प्रबंधक, यवतमाळ व व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर व प्रतिष्ठित व्यापारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्टेट बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक करत, आर्थिक समावेशनासाठी अशा संवादात्मक कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली.
या मेळाव्यात डिजिटल बँकिंग सुविधा, सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी कर्ज पर्याय, कृषी वित्त आणि ग्राहकहिताची विविध धोरणे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी ज्या मध्ये, केदार कोंडे उपप्रबंधक, हे रोहित मडावी, निलेश माहुरे यांनी उपस्थितांच्या शंका दूर केल्या व व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त आर्थिक सेवा स्पष्ट केल्या.
या कार्यक्रमाला व्यापारी, उद्योजक आणि इतर मान्यवर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी उमरखेड येथे प्रतिष्ठित व्यापारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उमरखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रदीप फटिंग यांनी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून, बँकेच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाची पुनरुज्ज्वल प्रतिज्ञा केली. याप्रसंगी ग्राहकांतर्फे पण एसबीआय उमरखेडला सहकार्य देण्याचे व स्टेट बँक शाखा व उमरखेड सोबत काय करण्याचे आश्वासन देण्यात आले.
–
Goreme open air museum Samuel R. ★★★☆☆ Green Tour’s Ihlara Valley hike is moderate difficulty (not easy). Seniors in our group struggled. Better difficulty labeling needed. https://soocian.com/read-blog/30781