वनसंवर्धन दिनानिमित्त राज्यस्तरिय आँनलाईन चित्रकला स्पर्धा.
वनसंवर्धन दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा
वनविभाग उमरखेड तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,उमरखेड जि.यवतमाळ द्वारा आयोजन
उमरखेड : सविता चंद्रे
सर्वसामान्य नागरिकां बरोबरच नवीन पिढीत सुद्धा वृक्षारोपण व वनसंवर्धनाबाबतची आस्था वाढत आहे. जगावर आलेल्या कोरोना ऑक्सिजन व वृक्षांचे महत्त्व जनसामान्यांना कळले आहे तरीही याबाबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन व्यापक जनजागृतीकरण्याच्या उद्देशाने येत्या २३ जुलै २०२१ रोजी येणार्या वनसंवर्धन दिनानिमित्त इयत्ता ५ वी ते १० यर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वनविभाग उमरखेड तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वनसंवर्धनदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत महाराष्र्ट राज्यातील कोणत्याही शाळेतील वर्ग पाच ते दहा मधील विद्यार्थी भाग घेऊ शकतात. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांने वनसंवर्धन संदेशाचे रेखाटलेले चित्र दिनांक २२ जुलै २०२१ च्या सायंकाळी ५ पर्यंत स्पर्धेचे परीक्षक 9373975675 नंबर वर पाठवावे.स्पर्धेतील विजेत्यांची नावे वनसंवर्धनदिनी म्हणजे दि.२३ जुलै रोजी जाहिर करुन त्याच दिवशी ऑनलाईन बक्षिस वितरण केले जाईल. स्पर्धकांनी आपले नाव, वर्ग, शाळेचे नाव व संपुर्ण पत्ता,मोबाईल क्रमांकासहित पाठविलेल्या चित्रांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट तीन कलाकृतींना
प्रथम बक्षिस ₹ ४०००/(चार हजार रुपये) व प्रमाणपत्र,द्वितीय बक्षीस ₹ २०००/( दोन हजार रुपये) व प्रमाणपञ,तृतीय बक्षिस ₹ १००० /(एक हजार ) व प्रमाणपञ स्वरूपात देण्यात येणार असून प्रत्येकी ₹ ५०० (पाचशे) व प्रमाणपञ असे तीन प्रोत्साहन पुरस्कार दिले जातील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन वनसंवर्धनासाठी चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करावी, असे आवाहन उपविभागीय वन अधिकारी अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ठाकरे,अमरावती विभाग अध्यक्ष तथा व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय राठोड,यवतमाळ जिल्हा सचिव गजानन रासकर,उमरखेड तालूका अध्यक्ष राजेश माने, सचिव गजानन वानखेडे व ईत्यादी सदस्यांनी केले आहे.