वसंत कारखान्याच्या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण.
वसंत कारखान्याच्या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण !
उमरखेड –
साखर आयुक्त्याच्या भंगार मंजुरी पत्रातील अटी व शर्ती मागे घेऊन भंगार मालाची संपूर्ण रक्कम सेवानिवृत्त कामगारांना देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी वसंत सहकारी साखर कारखान्याच्या वयोवृद्ध सेवानिवृत्त कामगारांनी येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .
साखर आयुक्ताने भंगार मंजूर पत्रात भंगार विक्रीतून येणाऱ्या रकमेतून शासन; वित्तीय संस्था व शेतकऱ्यांची देणे अदा करावी अशी अट घातली असून क्रमांक तीन ची सदर अट व शर्त मागे घेण्यात यावी तसेच उच्च न्यायालयाच्या ३० ऑगस्ट २०२२ चे आदेशानुसार १८१ कामगारांना ग्रॅज्युएटीची रक्कम ४ कोटी ७६ लाख १० हजार ८५० व त्यावरील १५ टक्के व्याज प्रमाणे मिळावी व ती रक्कम कोर्टात जमा करण्यात यावी , भंगार मालाची संपूर्ण रक्कम सेवानिवृत्त १८१ कामगारांनाच देण्यात यावी , उभय पक्षी अवसायक व युनियन मध्ये केलेल्या २१ जुलै २०२२ रोजी च्या कराराप्रमाणे ग्रॅज्युएटीची रक्कम भंगार माल विक्रीतून जमा होणारे संपूर्ण रक्कम कोर्टात जमा करावी अशा आशयाची मागणी साठी वसंत सहकारी साखर कारखाना च्या सेवानिवृत्त कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज बी बी मुनेश्वर , डी एम खंडाळे , आर एम राणे , पी आर दामोदर हे चार वयोवृद्ध सेवानिवृत्त कामगार उपोषणाला बसले आहेत
सोबत –
Hi there to all, for the reason that I am genuinely keen of reading this website’s post to be updated on a regular basis. It carries pleasant stuff.
Nice post. I learn something totally new and challenging on websites