ऊस उत्पादक शेतकऱ्याची उन्नती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही चेअरमन सुभाष देशमुख.

youtube

ऊस उत्पादक शेतकऱ्याची उन्नती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
चेअरमन सुभाष देशमुख

हदगाव

सर्व ऊस उत्पादकांच्या सहकार्याने व मदतीने शिऊर साखर कारखाना मर्या., वाकोडी यांचे 3 गळीत हंगाम व श्री सुभाष शुगर प्रा. ली. हडसणी या कारखान्याचे 2 गळीत हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केलेले आहेत. मागील दोन हंगामात कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त ऊस दर कसा देता येईल या करीता व्यवस्थापनाने सतत काटकसरीने कारखाना चालवून ईतर कारखान्यापेक्षा जादा दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, यापुढे पण जास्तीत जास्त दर कसा देता येईल या करीता कारखाना व्यवस्थापनाने शिऊर साखर कारखाना वाकोडी येथे 60 KLPD आसावनी प्रकल्प व श्री सुभाष शुगर प्रा. ली. हडसणी येथे 15 M. W. विद्युत निर्मीती प्रकल्प करण्याचे ठरविले असुन आसावनी प्रकल्पाचे 70% काम पूर्ण झाले असुन येत्या गाळप हंगामात प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात होणार आहे. तसेच श्री सुभाष शुगर प्रा. ली. येथे विजनिर्मीती प्रकल्पास सुरुवात झाली असुन 50% काम पूर्ण झाले आहे व पुढील वर्षाच्या गाळप हंगामात प्रत्यक्ष विजनिर्मीतीस सुरुवात होईल. या दोन्ही प्रकल्पामुळे कारखान्यास ऊस देणा-या ऊस उत्पादकास इतर कारखान्यापेक्षा निश्चित ज्यादा दर देता येईल. साखर उत्पादनाशिवाय इतर कोणतेही उत्पादन नसताना सुध्दा कारखाना व्यस्थापनाने यापुर्वी ज्यादा दर अदा केला आहे.

गाळप हंगाम 2021-22 मध्ये आजुबाजुचे कारखाने स्वताःच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक ठेवुन बंद केले परंतु शेतक-याचे नुकसान होऊ नये म्हणुन आपण 10 मे पर्यत कारखाना चालु ठेवला परीणामी काही प्रमाणात साखर उता-यात घट झाली. त्यामुळे FRP दर हा थोडा कमी निघाला. या हंगामात सर्व भागात पाऊसकाळ चांगला झाला असल्यामुळे सर्व भागात ऊस लागवड मोठया प्रमाणत झाली आहे. तरी सर्व ऊस उत्पादक बांधवाना नम्र विनंती आहे की या वर्षी इसापुर धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे व अतिवृष्टीने सर्व पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे येणा-या लागवड हंगामात जास्तीत जास्त ऊस लागवड करुन आपली नोंद आमच्या कारखान्याकडे दयावी तसेच या वर्षी उभा ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे. या वर्षी ऊस गाळपास न दिल्यास लागवड व खोडवा ऊसाची नोंद घेतल्या जाणार नाही. मागील वर्षीचा अनुभव पाहता हे अपप्रचार करणारे कारखाने व मंडळी कोणीही पुढील हंगामात ऊस गाळपास स्विकारणार नाहीत त्यामुळे कोणाच्याही भुलथापास व अपप्रचारास बळी न पडता जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व नोंद दयावी. नोंद दिलेल्या ऊसाची गाळपाची हमी आम्ही घेत आहोतच पण आपले पुढील वर्षी आसावनी व विदयुत प्रकल्प सुरु होणार असल्यामुळे आपला ऊस दर हा इतर कारखान्याच्या तुलनेत सर्वाधिक असणार आहे.
चौकट————————–
गाळप हंगाम 2021-22 मध्ये शिऊर साखर कारखाना मर्या., वाकोडी व श्री. सुभाष शुगर प्रा. ली हडसणी या दोन्ही कारखान्यास गळितास आलेल्या ऊसाकरीता अंतिम भाव 2400 रु. देण्याचे ठरले असुन यापुर्वी 2100 रु. प्रमाणे बँकेत जमा करण्यात आलेली असुन येत्या 15 दिवसात 200 रु. प्रति मे.टन व उर्वरीत 100 रु. द टवसरा, दिवाळी दरम्यान जमा करणार आहोत. सतत ऊस पुरवठा केल्याबददल आम्ही आभारी आहोत तसेच यापुढे आपले सहकार्य निश्चित लाभेल असे कारखान्याचे चेअरमन श्री. सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी सांगीतले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!