धमाल अविष्काराने पुष्परंजकची नृत्य स्पर्धा गाजली.

youtube

धमाल अविष्काराने पुष्परंजकची नृत्य स्पर्धा गाजली
उमरखेड …

मनमोहक अदाकारी, ठुमके, ठसकेबाज धमाल , भन्नाट नृत्य अविष्कार सादर करून परिसरातील कलावंतांनी पुष्परंजकची नृत्य स्पर्धा गाजवली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व दहीहंडी निमित्त पुष्परंजक डान्स क्लासेसच्या संचालिका कुमारी कोमल सोनटक्के यांनी या नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
या स्पर्धेला बाहेर गावातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सागर दास याने प्रथम क्रमांकाचे ₹ 3000 चे , समृद्धी चेके हिने द्वितीय क्रमांकाचे ₹ 2000 चे व रोहन त्रिपाठी यांनी तृतीय क्रमांकाचे ₹1000 चे बक्षीस पटकाविले. तसेच भगवान पवार, हर्षिका अहिर व खुशी घसे यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
यावेळी कृष्णा जाधव, कृष्णा नरवाडे, वैभव दरणे, श्रेयश शहा, सचिन शिंदे, शुभम कळलावे, डॉ. व्यवहारे, गिरीश भट्टड, गजानन बोराळकर, माजी शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, सरोज देशमुख, नमो महाराष्ट्र च्या पत्रकार सविता चंद्रे,, मुटकुळे,  सपना रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कु.स्वाती धामणकर हिने सूत्रसंचालन केले. किनवट येथील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गुरु पवार यांनी परीक्षक म्हणून पाहिले.
उमरखेड मध्ये मागील 4 वर्षापासून पुष्परंजक डान्स क्लास असून अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने या क्लासने परिसरातील नवोदीत कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आली.

Google Ad
Google Ad

1 thought on “धमाल अविष्काराने पुष्परंजकची नृत्य स्पर्धा गाजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!