उन्हाळी सुट्टीतील मामाचे गाव झाले इतिहासात जमा.
उन्हाळी सुट्टीतील मामाचे गाव झाले इतिहास जमा.
औरगांबाद…
पूर्वी विद्यार्थ्यांना सुट्ट्या म्हणजे पर्वणीच.
एकदाका सुट्ट्या झाल्या की मामाच्या गावाला जायचे. काय खेळायचे, धमाल करायचे याचे आराखडे बांधले जायचे. या खेळामुळे नवीन मित्र-मैत्रिणी व्हायचे. पण आता उन्हाळी तसेच संगणक मोबाईल टीव्ही मुळे सुट्ट्यातील मामाचे गाव इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी शहरातील मुलांना खेड्यात जायचे म्हटले की धमाल असायची, वर्षभर शहरात राहणारी मुलं गावाकडे आले की झाडावर चढणे, आंबे, जांभूळ, करवंदाचा आस्वाद घेणे, हे ठरलेलंच असायचं. दुपारच्या तसेच रात्रीच्या एकत्र जेवणाच्या पंगती पुन्हा अंगणात आजी-आजोबांसोबत अंगणात बसून गोष्टी ऐकायच्या. पण आता आजी आजोबा मामा मामी हेच एकत्र नाही. ग्रामीण भागातील एकत्र कुटुंब पद्धती आता विभक्त झाली आहे. तसेच गावातील पाणीटंचाई विद्युत लोडशेडिंग झाडांची झालेली तोड अश्या गोष्टींचाही परिणाम मामाच्या गावाला झाला आहे आता शहरी व ग्रामीण भागातील मुलांनाही उन्हाळी वर्ग, संगणक, अभ्यास, टीव्ही, मोबाईल गेम यामध्येच अधिक गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे मुलांनाही आता मामाचे गाव नकोसे झाले आहे. आजी आजोबांच्या गोष्टीतही त्यांना आता रस राहिलेला नाही तर आधुनिक आजी आजोबा आपल्या नातवांना मोबाईल गेम लोड करून देताना दिसत आहेत. पूर्वी दोन दोन महिन्याच्या सुट्ट्या मामाच्या गावी घालणारी मुले आता दोन दिवसाची प्रेक्षणीय स्थळांची टूर काढून उन्हाळी सुट्टी साजरी करत आहेत.
*विशेष लेख*
*प्रा.आर.बी.अंभोरे विद्यानिकेतन हायस्कूल सिडको औरंगाबाद*
*तथा*
*युवक राज्य संघटक महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन*