उमरखेड येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला तेलंगणातुन अटक.
उमरखेड येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नाराधम आरोपीला तेलंगानातुन अटक.
24 तासात अटक ; पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
उमरखेड:-(ता.प्र.) पाच वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर उमरखेड पोलीस स्टेशन ला आरोपीस अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.
आरोपी नज़ीर उस्मान शेख दौला याला तेलंगाना राज्यातील नवी पेठ येथून पकडन्यात आले आहे. उमरखेड पोलीस प्रशासनाने तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात फरार आरोपी नज़ीर यास अटक करून मोठी कामगिरी केली आहे.
आरोपीचे लोकेशन मिळताच नादेड येथील पोलीस व तेलंगणा येथील पोलीसाचि मदत त्याना पकडण्यास सर्व चे परिश्रम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे, एपीआय गाडे, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वागतकर, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश शेळके, होम गार्ड समिर, आसिफ यांचे पथक तेलंगणा कडे रवाना करण्यात आले होते. सदर प्रकरणी लोकांमध्ये रोष होता. नागरिक अरोपीला पकडण्याची व फाशीची मागणी व्हावी म्हणून निवेदन देत होते. पोलीस प्रशासनातर्फे अधिक तपास सुरु असून आरोपीस पकडन्यास मोठे यश मिळाल्यामुळे आणि पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीवर सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.