महागाव रोड लगत असलेल्या भेळ भांडाराला आग (हजारोंचे नुकसान, अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला ) उमरखेड :

महागाव रोड लगत असलेल्या भेळ भांडाराला आग
(हजारोंचे नुकसान, अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला )
उमरखेड :
राजे छत्रपती संभाजी उद्यानासमोर असलेल्या नगरपरिषदेच्या चौपाटीतील लक्ष्मी भेळ भांडार या दुकानाला आज 1 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजता अचानक आग लागली. काही वेळातच दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला व दुकानमालक बालाजी कुंभारे यांना कळवले.अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. दुकानात दोन गॅस सिलेंडर असल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला. या आगीत हजारों रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले. पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी हजेरी लावून परिस्थितीचा आढावा घेतला.
My partner and I absolutely love your blog and find nearly all of your post’s to be exactly I’m looking for. Does one offer guest writers to write content for you personally? I wouldn’t mind publishing a post or elaborating on most of the subjects you write about here. Again, awesome web log!