वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा वडाचे संगोपन करा-सरोज देशमुख
वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा वडाचे संगोपन काळाची गरज सरोज देशमुख
जिजाऊ ब्रिगेडतर्के वटवृक्षाचा द्वितीय वाढदिवस संपन्न
उमरखेड
जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातुन सन २०१९ ला वटसावित्री उत्सवाच्या पर्वावर वटवृक्षाचे रोपटे लावण्यात आले त्या घटनेला या वर्षीच्या वटसावित्रीला दोन वर्ष होत असून वटसावित्रीच्या पर्वावर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सरोजताई देशमुख यांच्या उपस्थितीत वटवृक्षाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गेल्या एक दिड वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण समाजाची जीवीतहाणी सोबत वित्तहाणी मोठया प्रमाणात झाली, जगण्याचे संदर्भ बदलले, कोरोनामुळे माणुसकी संपल्याचा अनुभव अनेकांना आला, आरोग्याच्या बाबतीत डॉक्टर देव नाही तर कसाई असल्याचा अनुभव बहुतांष कोरोना रूग्नानी अनुभवला, मानवाच्या अतिरेकी धोरणाने जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला, मागील दोन चार वर्षाचे अनेकांना केवळ वृक्षारोपनाची सेल्फी काढून वृक्षारोपनाचा देखावा केला ,मात्र जिजाऊ ब्रिगेडने दोन वर्षापूर्वी वडाच्या झाडाचे रोपटे लाऊन व्यवस्थित संपोपन केल्याने दोन फुटाचा वटवृक्ष आठ फुट झाले, त्या वटवृक्षाचा दुसरा वाढदिवस वटसावित्री पर्वावर साजरा करित पर्यावरण रक्षणाचा संदेश जिजाऊ ब्रिगेडने दिला ,आजघडीला वडाला फेऱ्या मारुन पर्यावरणाच रक्षण होणार नाही तर प्रत्येक महिलेनी वटसावित्रीला एक झाड लावा असा संदेश जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोजताई देशमुख यांनी या प्रसंगी दिला आहे .