ठाणेदार कैलास भगत यांना जिव्हाळा संस्थेने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित.
ठाणेदार कैलास भगत “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित.
– जिव्हाळा संस्थेने केले सन्मान चिन्ह देऊन सन्मानित.
१५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना माहामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिव्हाळा या सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणेदार कैलास भगत साहेब यांचा कोरोना योध्दा म्हणून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस प्रशासनाच्यावतीने कोरोना माहामारीच्या काळात कोविड १९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने उलेखनीय कर्तव्य सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, जोपासत शासकीय मदत व योजनांची माहिती सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहोरात्र महेनत घेतली त्या निमित्ताने इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड यांच्या वतीने दि १५ ऑगस्ट २१ रोजी ठाणेदार कैलास भगत साहेब यांना “कोरोना योद्धा म्हणून सन्मान करून त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष श्री. अतुल लता राम मादावार आणि संस्थेच्या टिमच्या हस्ते गौरव करण्यात आला . या प्रसंगी नव्याने रुजू झालेले पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. राजीव हाके साहेब ,
पत्रकार प्रदीप बारहाते, भागवत काळे , सुनील ठाकरे, सुधाकर जाधव, अर्चना ताई भोपळे तसेच जिव्हाळा संस्थे चे धम्मदीप कांबळे, कपिल गायकवाड, आकाश शिंदे सोबत पोलीस स्टेशन पोफाळीचे कर्मचारी उपस्थित होते.