शहरातील बालीका लैंगिक अत्याचार पोक्सो च्या गुन्हात आरोपीस अटक ; आरोपीला न्यायालयीन कोठडी.
शहरातील बालीका लैंगिक अत्याचार पोक्सो च्या गुन्हात आरोपीस अटक ; आरोपीला न्यायालयीन कोठडी .. !
उमरखेड –
शहरात बुधवारी दुपारी दरम्याण घरी एकटी आठ वर्षीय निरागस बालिका हिला पाहुन नराधमाने बळजबरी करित अतिप्रसंग केला हि घटना एका कॉलनीत १९ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ : ३० वाजताच्या सुमारास घडली पिडीत बालीका रडत होती तेव्हा तीच्या जवळ नातेवाईक येताच तीने झालेला अत्याचार कथन केला तेव्हा हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला , या प्रकरणी पिडीतेच्या नातेवाईक यांनी उमरखेड ठाण्यात फिर्याद दाखल केली त्या वरुन ठाणेदार शंकर पांचाळ यांनी बालीका लैंगिक अत्याचार प्रकरणी २० ऑक्टोंबर रोजी पोक्सो चा गुन्हा दाखल करून या घटनेत आरोपी दिगांबर सुर्यवंशी रा उंचवडद ( ५९ ) या नराधमास अटक केली आहे
आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून , या प्रकरणात अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार , जमादार सरनाईक सह पोलीस कर्मचारी करित आहेत.