राष्ट्रीय महामार्ग 100 फुटाच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते यांनी निवेदन दिले.

youtube

माहूर शहरातून जात असलेले राष्ट्रीय महामार्ग १०० फुटाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते मंडळी सरसावली !

निवेदन दिले, आता रस्त्यासाठी रस्त्यावर आंदोलन !

श्रीक्षेञ माहूर – तालूका ‍‍प्रतिनिधि-सुरेखा बालाजी तळनकर

माहूर शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असताना पूर्वी प्रमाणे दुभाजक,१०० फुटावर नाली आणि सर्व्हिस रोड निर्माण न करता ७० फुटाचा रस्ता करण्याचा घाट महामार्ग विभागाने घातला आहे.त्या विरोधात अनेक निवेदन सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आले आहे.मात्र महामार्ग विभाग दखल घेत नसल्याने तीर्थक्षेत्रांच्या माहूर शहराचे विदृपिकरण होऊ देणार नाही,पूर्वी प्रमाणे १०० फुटाचा रस्ता व्हावा या साठी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माहूर शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी दिला आहे.

माहूर शहरात व तालुक्यात सध्या राष्ट्रीय महामार्ग(१६१ अ) चे काम सुरू आहे.या कामात प्रचंड अनियमितता असून सदर चे काम हे राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाला धरून नसल्याने अनेक ठिकाणी चढ उतार असल्याने या निर्मानाधिन कामात अनेकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ रस्त्याचे काम महामार्ग नियमाप्रमाणे करा अशी मागनी दिनांक ४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, प्रहार जनशक्ती पार्टी, मनसे,वंचित बहुजन आघाडी माहूर तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी,महामार्ग विभाग, व सहायक जिल्हाधिकारी किनवट यांना दिले होते,त्या नंतर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना भेटून अडचणी सांगितल्या असता त्यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन त्वरित बैठक लावण्यात यावी असे निर्देश दिले होते.मात्र एक महिना लोटला तरी महामार्ग विभागाच्या कानावरची जू सरकली नाही.परिणामी दि.५ मे रोजी माहूर शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.या वेळी भरपूर निवेदन दिले, आता पुरे,रस्त्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणार अशी भूमिका नगराध्यक्ष फिरोज दोसानी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,सोशल मीडिया विधानसभा प्रमुख जितू चोले,पाणी पुरवठा सभापती अशोक खडसे,नगर सेवक प्रतिनिधी इरफान सय्यद,रणधीर पाटील,अपसर आली,प्रा.भगवान राव जोगदंड,उपसरपंच प्रफुल्ल पारसकर,काँग्रेस चे किसन राठोड,विकास कपाटे,सुजित बेहेरे,राजू चव्हाण,मन्सूर आली,अभी खंदारे,राष्ट्रवादी चे शहर प्रमुख अमित येवतिकर,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

चौकट…

माहूर किनवट तालुक्यात सुरू असलेल्या अरुंद महामार्ग कामा संदर्भात अनेक तक्रारी गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहचल्या आहेत.माहूर शहर वाशियांची मागणी रास्त व नियमाला धरून आहे.शहरात १०० फूट जागा बांधकाम विभागाच्या ताब्यात होती,जी आता महामार्ग विभागाकडे आली आहे.महामार्ग झाल्याने साहजिकच रस्त्याची रुंदी वाढणे अपेक्षित आहे,मात्र त्यांनी १०० फुटाचा रस्ता ७० फुटावर आणला आहे.रस्ता १०० फुटाचा झाला नाही तर पुढील काम होऊ देणार नाही.रस्त्यावर जन आंदोलन उभारू

फिरोज दोसानी
नगराध्यक्ष माहूर

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!