रमजान ईद गोंंडवडसा येथे आनंदात साजरी.

youtube

रमजान ईद गोंडवडसा येथे आनंदात साजरी.

श्रीक्षेञ माहूर – तालुका प्रतिनीधि -सुरेखा तळनकर

मुस्लीस बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात सतत ३० दिवसांच्या कडक उपवासा नंतर दि.२ मे रोजी चंद्रदर्शन झाले. त्यामुळे दि. ३ मे रोजी संपूर्ण तालुक्यात रमजान ईद साजरी करण्यात आली.तालुक्यातील मौजे गोंडवडसा येथील मुस्लिम बांधव हे सकाळी ८:३० वाजता आप आपल्या घरुण निघत गावालगत असलेल्या इदगाहवर पोहचले.या ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात आली.तसेच संपूर्ण जगात शांतता राहण्याकरिता यावेळी मुस्लीम बांधवांनी प्रार्थना करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.इदगाहवरुण परत येणार्‍या मुस्लीम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, माजी सभापती उमेश जाधव व आदींनी मुस्लिम बांधवांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शुभेच्छा देण्याची ही परंपरा कायम दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!