लहान मुलांच्या भांडणाचे कारणावरून लाकडी बँटने डोक्यावर मारून केले जखमी.
लहान मुलाच्या भांडणाचे कारणावरून लाकडी बॅटने डोक्यावर मारून केले जखमी-उमरखेड येथील आंबेडकर वार्डातील घटना.
उमरखेड(शहर प्रतिनिधी)
उमरखेड शहरातील आंबेडकर वार्ड येथे दि 6 ऑगष्ट रोजी लहान मुलाच्या भांडणाचे कारणावरून लाकडी बॅटने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तक्रारदार मारोती वाघोजी दिवेकर वय वर्ष 69 रा आंबेडकर वार्ड उमरखेड हे आपल्या स्वतःच्या घरी हजर असतांना यातील अनिकेत कैलास दिवेकर वय वर्ष 20 रा आंबेडकर वार्ड उमरखेड याने लहान मुलाच्या भांडणाचे कारणावरून मारोती दिवेकर यांच्यासोबत वाद करून शिवीगाळ केली तसेच हातातील लाकडी बॅटने मारोती दिवेकर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला कानाच्या वर मारून जखमी केले.
व जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी मारोती दिवेकर यांनी घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना देऊन तक्रार नोंदविली असता पोलिसांनी सदर आरोपीवर गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दि 7 ऑगष्ट रोजी पोलिसांकडून देण्यात आली आहे,या घटनेचा पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशन करीत आहे.