शिवनामाच्या जयघोषाने दुमदुमत आहे औदुंबर नगरी महात्मा बसवेश्वर संस्थान मधील शिव कथेला भक्तांची अलोट गर्दी.
शिवनामाच्या जयघोषाने दुमदुमत आहे औदुंबर नगरी
महात्मा बसवेश्वर संस्थान मधील शिव कथेला भक्तांची अलोट गर्दी
उमरखेड :-
औदुंबर नगरीतील धार्मिक अधिष्ठान म्हणून ओळख असलेल्या महात्मा बसवेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहातील वाशिम येथील शिव कथाकार शि.भ.प. सागर महाराज यांच्या शिवकथेला भक्तांचा अलोट जनसागर उसळत असून शिवभक्तांमध्ये मोठा हर्ष उल्हास दिसून येत आहे. दररोज सायंकाळी ७ ते १० या दरम्यान सादर होणाऱ्या शिव कथेचा समारोप महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर होणार आहे.
शिवकथा कथन करताना सागर महाराजांनी आपल्या अमोल वाणीतून भक्तांना भगवान महादेव व माता पार्वती यांच्यामधील झालेल्या संवादाचे अर्थातच शिवकथेमधील अनेक प्रसंग सांगून भक्तांना मंञमुग्ध केले. लिंग उत्पत्ती कशी झाली, लिंग पूजा कशी करावी ? याचे महात्म्य सांगून कलियुगामध्ये आपल्याला शिवभक्ति तारणार आहे. शिवाचे नाम जपणे, शिव कथा श्रवण करणे, आणि शिवाचे ध्यान करणे या तीन गोष्टी महाराजांनी समजून सांगितल्या. या तिन्ही गोष्टी कलियुगामध्ये आपल्याला शिवलोकाची प्राप्ती करून देऊन मोक्ष मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या वादातून भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग प्रगट झाल्याचे सुंदर विवेचन महाराजांनी आपल्या कथेतून केले.
शिवकथा सादर करताना शि.भ.प. सागर महाराजांनी गुरुचे महत्त्व सांगून आपल्या मूळ गुरूला विसरून इतर गुरूंच्या मागे भक्तांनी पळू नये असा मोलाचा सल्ला दिला. मानवाच्या जीवनामध्ये येणाऱ्या चार आश्रमाचे महत्त्व सांगितले त्यामध्ये ब्रह्मचार्याश्रम ,गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांचे महत्त्व स्पष्ट केले.त्यांनी भगवान नारदांनी भगवान ब्रम्हादेवाला शिव कथा विचारण्याचे कारण कथा रूपाने सांगितले. यासोबतच मार्कंड्य या शिवभक्ताची तसेच महान शिवभक्त उपमन्यू यांच्या शिवभक्तीची महिमा कथन केली.
कोरोना सावटा नंतर होणाऱ्या अखंड शिवनाम सप्ताहात मधील या शिवकथेमुळे औदुंबर नगरी भक्तीमय वातावरण असून ,नगरीच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची पावले महात्मा बसवेश्वर संस्थान शिव मंदिराकडे वळत आहेत .उर्वरित शिवकथेचा ,महाशिवरात्री उत्सवाचा, तसेच गु.ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या प्रसाद रुपी शिवकिर्तनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ सर्व शिवभक्तांनी घ्यावा. असे आवाहन महात्मा बसवेश्वर संस्थान व अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
———————————-
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.