सार्वजनिक बांधकाम पुसद विभागाने गाठला भ्रष्टाचाराचा कळस.

youtube

सार्वजनिक बांधकाम पुसद विभागाने गाठला भ्रष्टाचाराचा कळस

(मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी)

उमरखेड…
सार्वजनिक बांधकाम पुसद विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून या संबंधानेमुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्याकडे पाचशे रुपयांच्या शपथपत्रावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यांच्यावर निष्पक्ष कडक कारवाई न झाल्यास नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा शपथपत्र धारकाने केला आहे.
पुसद सार्वजनिक बांधकाम विभाग येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पुसद वाशिम रस्ता 120 .97 कोटीची निविदा प्रसिद्ध झाली असताना पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी वाढीव बिल 162 कोटीचे पाठवून भ्रष्टाचार केलाय तसेच या कामांमध्ये गौण खनिज वापरण्यात आले त्या पोटी कंत्राटदाराच्या बिलातून 70 लाख रुपये कपात करण्यात आली परंतु रॉयल्टी ची रक्कम शासनाच्या कोशागारात किंवा खनिज विभागात न भरता कंत्राटदार खोडके कन्स्ट्रक्शन कंपनीला परत करण्यात आली यामध्ये कंपनी कार्यकारी अभियंता उपअभियंता यांनी समप्रमाणात वाटून घेतल्याचा आरोप शपथपत्रात करण्यात आलाआहे पुसद वाशिम रस्त्यावर इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग पोल डीपी वायर ओढणे अशी बरेच कामे यामध्ये होती वाशिम पुसद रस्ता हा 120.97 कोटीचा असून त्याची लांबी 56.49 एवढी आहे परंतु कार्यकारीअभियंता व उपअभियंतायांनी रस्त्याचे 60 किलोमीटर काम दाखवून त्या रस्त्याचे 162 कोटी एवढी रक्कम काढली त्यामुळे चार किलोमीटर हा रस्ता फॉरेस्ट मध्ये आहे तसेच वनसंवर्धन 1980 कायद्याचे उल्लंघन करून सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यात आला आहे त्यात चार किलोमीटरचे 42 कोटी रुपये जादा काढून त्यामध्ये कार्यकारी अभियंता उप अभियंता व कंत्राटदार यांनी वाटून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4480 एवढी झाडे लावायची होती झाडाची व रस्त्यांची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती असून त्याची किंमत 80 लाख एवढी रक्कमआहे परंतु आज रोजी त्या रस्त्यावर एकही झाड नाही मात्र पैसे उचलण्यात आले आहे तसेच सोशल इन्व्हरमेंटल चे काम करावयाचे होते परंतु तेही काम न करता बिल उचललेले आहे याच प्रमाणे पुसद वाशिम रस्त्यावरील जुने पूल काढून नवीन पूल बसवले होते परंतु जुने पूल परस्पर भंगार मध्ये विकले काही ठिकाणी जुनी पाईपलाईन परस्पर काढून विकली याची गोपनीय चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर निलंबन करून फौजदारी करण्यात यावी अशी मागणी शपथपत्रात केली आहे आज मीतिस पुसद विभाग अंतर्गत पॅचेस ची जी कामे चालू आहे त्यामध्ये डांबरी खड्डे बुजवणे चालू असून झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे यामध्ये आणखी बिटरगाव जेवली सोनदाबी, खरबी रस्ता व पुसद भोजला राखी रस्ता तसेच वडगाव जुना खंडाळा देवठाणा पळशी रस्ता व गुंज माळेगाव रस्त्यावर लहान मुलाचे व संरक्षण भिंतीचे कामे करणे या चारही कामापैकी फक्त पाच ते सात टक्के कामे झाली असून संबंधित कंत्राटदार अरुण मनवर व वैभव बजाज या दोघांना 76 लाख रुपये देयके देण्यात आली आहे या कामांमध्ये कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांची भागीदारी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पुसद विभागातील अभियंता प्रकाश झळके यांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या परंतु त्यांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत आहेत त्यामुळे भ्रष्टाचार वाढत चालला असून प्रकाश झळके यांची पुसद उमरखेड येथून त्वरित बदली करून त्यांना इतर ठिकाणी देण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

मर्जीतल्याठेकेदाराला ७६ लाख व इतर ठेकेदारांची एक, दीड, दोन लाख असे रुपये देऊन बोळवण करण्यात आली यावर्षी पावसाळा दिवाळीपर्यंत सुरू असताना चार दिवसाच्या कामांमध्ये एवढी रक्कम देण्याचे कारण काय बाकी कंत्राटदाराची शंभर टक्के कामे झालेली असताना त्यांना का देयके देण्यात आली नाही याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

चौकट
उपअभियंता प्रकाश झळके यांच्याकडे पुसद, उमरखेड, महागाव या तीन उपविभागाचे पदभार असल्यामुळे झळके एक नंबरचा भ्रष्ट अभियंता असल्याचा घनाघाती आरोप तक्रार कर्त्यांनी केला असून सदर उपअभियत्याची अगोदर बदली करून त्यांच्या झालेल्या कामाची व चालू असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी जी कामे दिवाळीपर्यंत करण्यात आली नव्हती ती कामे थातूरमातूर करण्याचा सपाटा सुरू आहे या कामावर विश्वासू अधिकारी पाठवून चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे तसेच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या इमानदारीच्या खुर्चीला जागून यांच्यावर निष्पक्ष कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा मला नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून न्याय मिळवावा लागेल यासाठी मी सदैव संघर्ष करत राहील अशी मागणी रवींद्र परसराम जैन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!