उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा.

youtube

उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा

(प्रहार शेतकरी संघटना,अनिल माने यांच्या नेतृत्वात तहसील उमरखेड येथे ठिय्या)

उमरखेड

उमरखेड महागाव – तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करून शेतकऱ्यांची विमा कंपनीने फसवणूक केली आहे.कारण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कंपनीकडे क्लेम केलेला असतांना काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रिमियम पेक्षाही कमी पैसे जमा करण्यात आले..
आहेत व काही शेतकरी वंचित राहीले आहेत तरी तहसील दार यांनी बाबींचा विचार करून उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करून आठवड्यात शेतकन्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी .
व तालुक्यातील जे शेतकरी पीक विम्यापसुन वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात यावे अन्यथा ‘प्रहार’ शेतकरी संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आमरण उपोषण करण्यात येईल..असा इशारा ‘प्रहार’ शेतकरी संघटना यांच्या वतीने देण्यात आला,
विश्वास पतंगे,( प्रहार शेतकरी ता.अध्यक्ष ) बंडू हामंद (प्रहार ता.प्रमुख)लालजी पतंगे,आशिष हामंद, अंकुश पानपट्टे ,विवेक जळके,सावन हिंगमिरे,संतोष माने,बबलू जाधव, बालाजी माने, संतोष माने, गोविंदराव सावंत,फकीरराव श्रोते, आबाराव वाघमारे, प्रमोद दवणे, व उमरखेड तालुक्यातील इतर शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया- आनंद देऊळगावकर

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करण्यात आले आहे.यासंदर्भात मी जिल्हाधिकारी येडगे यांना तात्काळ उमरखेड तालुक्यातील पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी अत्यल्प पैसे जमा करण्यात आले आहे.
तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे जमा करण्यात यावेत व वंचित शेतकरी आहेत.त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासंदर्भात अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले.

 

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!