मनोरुग्ण ‘प्रगती’ .नंददीप फाऊंडेशन मुळे दोन वर्षानंतर स्वगृही मध्यप्रदेश येथील थावडी येथे.

youtube

मनोरुग्ण ‘प्रगती’ .नंददीप फाऊंडेशन मुळे दोन वर्षानंतर स्वगृही मध्यप्रदेश येथील थावडी येथे

यवतमाळ : मानसिक असंतुलनामुळे भटकंती करीत असलेल्या प्रगती ककोडिया हिच्यावर नंददीप फाऊंडेशन बेघर निवारा केंद्रात उपचार झाल्याने ती आता बरी झाली आहे. येथे निःस्वार्थ वृत्तीने कार्यरत डॉ.श्रीकांत मेश्राम यांच्या उपचारामुळे हे शक्य झाल्याने मनोरुग्ण प्रगती आता आयुष्याच्या प्रगतीपथावर मार्गस्थ झाली आहे.
मूळची मध्यप्रदेश राज्यातील थावडी येथील रहिवासी पूजा उर्फ प्रगती ही तरुणी मानसिक आजाराने ग्रस्त असून ती मागील दोन वर्षांपासून घरून बेपत्ता आहे. काही दिवसांपूर्वी ती नागपूर ते कळंब मार्गाने भटकत असल्याची माहिती नंददीप फाऊंडेशनला मिळाली त्यानंतर तिला त्याच अवस्थेत निवारा केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांनी यशस्वी उपचार केल्याने तिच्यात आता सुधारणा दिसून येत आहे. सोशल मीडियावर तिची माहिती प्रसिद्ध केल्याने मध्यप्रदेशातील तिच्या कुटुंबीयांचा शोध लागला यासाठी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रमेश केळकर व त्यांचे सुपुत्र यांनी मेहनत घेतली. २६ नोव्हेंबरला छोटेखानी कार्यक्रम घेत प्रगतीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी अवधूतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत कसारे, ज्येष्ठ समाजसेवक प्रशांत बनगिनवार,गोविंद शर्मा,ग्रामसेवक संजय बोरगावकर,पत्रकार आनंद कसंबे, नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, नंदिनी शिंदे,उपाध्यक्ष सुनील काळे, रमेश केळकर आदी उपस्थित होते.
५९ मनोरुग्ण बरे होऊन स्वगृही
सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या संयुक्त परिश्रमातून हे केंद्र मनोरुग्णांना नवे जीवन प्रदान करीत आहे.
२६ नोव्हेंबरपर्यंत उपचारानंतर या केंद्रातील ५९ मनोरुग्ण बरे होऊन स्वगृही परतले असून १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्यावर उपचार करीत त्यांची काळजी घेतात.
असे दाखल होतात मनोरुग्ण
प्रामुख्याने स्किझोफ्रेनिया याच आजाराने ग्रस्त व्यक्ती भटकत राहतो. त्यांना स्वतःची स्वच्छता ठेवता येत नाही. त्यांना स्व:भान नसतेच आणि मानसिक आजारातील सर्वात गंभीर असा हा आजार आहे. जिल्ह्यासोबतच परराज्यातील मनोरुग्ण रस्त्यावर आढळून आल्यास कुणीतरी जागरूक व्यक्ती नंददीप फाऊंडेशनशी संपर्क साधतो. त्यानंतर त्याला आपल्या निवारा केंद्रात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते.

खऱ्या समाजसेवकांची मिळते मदत
जिथे कुटुंब दूर करते समाजाची संवेदनशीलता संपते तेथून नंददीप फाऊंडेशन आपल्या माणुसकीचा प्रत्यय देत मनोरुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी कार्य करते. फाऊंडेशनचे अध्यक्ष
संदीप शिंदे यांनी स्वतः पासून मनोरुग्णांसाठी काम सुरू केले आज त्यांच्या सोबत शेकडो संवेदनशील व्यक्ती जुळले आहेत. यात सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ समाजसेवजकांची फाऊंडेशनला मिळणारी मदत खऱ्या समाजसेवेचे उदाहरण आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “मनोरुग्ण ‘प्रगती’ .नंददीप फाऊंडेशन मुळे दोन वर्षानंतर स्वगृही मध्यप्रदेश येथील थावडी येथे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!