कुजलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.

youtube

कुजलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह

उमरखेड प्रतिनिधी :
येथील बाळदी रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे दारू पिण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत झुडपात मृतदेह आढळून आल्याची घटना बाळदी रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे दि 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली .
गोपाल सुधाकर मिरासे वय 25 वर्ष रा बाळदी ता उमरखेड असे मृतकाचे नाव आहे अशी गावकऱ्यांकडून ओळख पटली. तो दिनांक 1 मार्च पासून बाळदी येथून गेला होता. परत न आल्याने घरच्या लोकांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रारी दिली होती.
आज दि 5 मार्च रोजी आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे परिसरातील एक व्यक्ती शौचास गेला असताना रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान झुडपातून दुर्गंध येत होता. अशी माहिती त्या नागरिकांनी उमरखेड पोलिसांना दिली. त्याच क्षणी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले तेव्हा झुडपात कुजलेला मृतदेह आढळून आला व घटना परिसरात रक्ताने माखलेला शेला, चप्पल आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या . पोलिसांना गावकऱ्यांच्या सहकार्याने ओळख पटली असता मृतदेह गोपाल मिराशेचा असल्याचे कळाले. मृतदेह उत्तरी तपासणीसाठी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सी एम चौधरी , पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहे .
अद्यापही मृत्यूचे कारण कळाले नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .

Google Ad
Google Ad

2 thoughts on “कुजलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!