नगरपालिके अंतर्गत होणारे विकास कामे निकृष्टच. विद्यमान अभियंताच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह ?
नगरपालिके अंतर्गत होणारे विकास कामे निकृष्टच. विद्यमान अभियंताच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह ?
किनवट प्रतिनिधी – (लक्ष्मीकांत मुंडे)
शहर विकास कामाची मालिका सुरूच आहे, पण कामाच्या दर्जेबाबत शहरवासीयात कमालीची नाराजी पसरली आहे. चुकीच्या ठिकाणी फेवर ब्लॉक त्यामुळे नाल्या तुडुंब भरल्या, सदर घाणीचे पाणी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहत असून परिणामी व्यापारी, जनतेला रोगराईचा सामना करावा लागत आहे. सदर निकृष्ट कामास व चुकीच्या पद्धतीला किनवट नगरपालिकेत गत दोन वर्षापासून ठाण मांडून बसलेले व गुत्तेदाराशी आर्थिक हितसंबंध जुळलेल्या विद्यमान अभियंत्याच्या कर्तव्यावर नागरिकांचा संशय असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व विकास कामाची गुण नियंत्रण पथकामार्फत तपासणी करण्यात यावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट शहर विकासासाठी दोन वर्षात कोठ्यावधीचा निधी आला. पण त्या निधीचा असे बोगस निकृष्ट दर्जाचे कामे करून पूर्णतः वाट लावली. सदर कामाचा दर्जा, कामाची गुणवत्ता उत्तम व पक्की व्हावी यासाठी शासनाने नगरपालिकेत अभियंत्याची नेमणूक केली खरी पण असे अभियंते जर गुत्तेदाराशी आपले हित जुळवून घेत असतील तर कामाचा दर्जा कसा राहणार ? असा प्रश्न जनतेला पडलेला असून शहरात झालेल्या अशा प्रत्येक कामाची गुणवत्ता विभागामार्फत चौकशी केली तर सर्व गौडबंगाल उघड होईल, सदर झालेल्या नाली, फ्लेवर ब्लॉक, सी.सी. रस्ते, वाल सारख्या कामाची किती गुणवत्ता आहे ? आणि संबंधित अभियंतेच्या संगनमताने किती भ्रष्टाचार झाला आणि शासनाच्या तिजोरीतले किती रुपये पाण्यात गेले? हे कळेल एवढे मात्र खरे.