पोफाळी हद्दीतील मतदान केंद्र च्या परिसरात पोलीस महिला अधिकाऱ्यांचे सराहनीय कार्य: दिव्यांग मतदारांसाठी दिला समर्पणाचा संदेश उमरखेड प्रतिनिधी :-
महिला अधिकाऱ्यांचे सराहनीय कार्य: दिव्यांग मतदारांसाठी दिला समर्पणाचा संदेश
उमरखेड प्रतिनिधी :-
पोस्टे पोफाळी हद्दीतील मतदान केंद्रावर पोलिसांनी दिव्यांग महिला आणि पुरुष मतदारांसाठी अनोख्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला, ज्यामुळे मतदान प्रक्रिया सर्वसमावेशक आणि निर्भय असल्याचा संदेश मिळाला. विशेषतः पोलीस महिला अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे.
मतदानादरम्यान, दिव्यांग मतदारांसाठी सहाय्य करण्यासाठी पोलीस महिला अधिकारी सतत सज्ज होत्या. त्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत केली, व्हीलचेअर व्यवस्थापन केले आणि मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे दिव्यांग मतदारांनी निर्भयतेने आणि आत्मविश्वासाने मतदानाचा हक्क बजावला.
या सराहनीय उपक्रमाने पोलिसांच्या मानवतेचे दर्शन घडवले. पोलीस महिला अधिकाऱ्यांच्या या समर्पणाची सर्वत्र प्रशंसा होत असून, त्यांच्या या कार्यामुळे लोकशाहीला अधिक मजबुती मिळाली आहे.
या आदर्श कार्यामुळे पोलीस विभागाने दिव्यांगांसाठी केलेल्या प्रयत्नांचा आदर वाढवला असून, लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग हा प्रमुख उद्देश असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मतदान प्रकियेत सहभागासाठी पोलिसांनी अश्या प्रकारे मदत करून मतदान प्रक्रिया सर्वांसाठी आणि निर्भीड असल्याचा संदेश दिला.
Mehmet Akif su kaçak tespiti Ortaköy su kaçağı tespiti: Ortaköy’de su kaçağını nokta atışıyla tespit ediyoruz. https://kiigasofthub.com/ustaelektrikci