पुरात वाहुन गेलेला युवक वापस-स्थानिक पथकाच्या मदतीने.

youtube

 

पुरात वाहून गेलेला युवक सुखरुप वापस..उमरखेड

उमरखेड – काल रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सर्व नदी नाले भरून वाहू लागले.त्यामुळे पुसद ते उमरखेड रोड बंद झाला होता. दहागाव जवळील नाल्यावर एक युवक विजय येलुतवाड राहणार कुपटी वय 35 वर्ष हा पाण्यातून येत असताना वाहून गेला. तो काही अंतरावर एका उंबराच्या झाडाला अडकल्याने तो झाडावर जाऊन बसला त्यामुळे तो वाचला प्रशासनाची तारांबळ उडाली. स्थानिक तहसीलदार देऊळगावकर तसेच ठाणेदार वागतकर  तेथे पोहचले व तातडीने स्थानिक पथकाच्या मदतीने विजय यास वाचवले.तसेच तहशिलदार व ठाणेदार यांनी  नागरिकांना आव्हान करून घरीच राहण्याचा सल्ला दिला. प्रशासनाने वेळेवरच दखल घेतल्यामुळे या युवकाचा प्राण वाचला.उमरखेड तालुक्यात एकंदरीत मोठा पाऊस झाल्यामुळे उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाऊस साचल्याने पिकाचे नुकसान झाले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!