पुणे चिंचवड येथे “द जर्नलिस्ट असोसिएशनचा अभूतपूर्व कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

youtube

पुणे चिंचवड येथे “द जर्नलिस्ट असोसिएशनचा अभूतपूर्व कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

 

पुणे….
द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने पुणे चिंचवड येथे प्रा रामकृष्ण मोरे सभागृहात जर्नलिस्ट एसोसिएशन (नवी दिल्ली) पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा पत्रकार, डॉक्टर, पोलीस, परिचारिका कलावंत यांच्या सन्मानार्थ आयोजित केला होता.
यावेळी”द जर्नलिस्ट असोसिएशनचे (नवी दिल्ली) राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद पानसरे,
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख,पुणे जिल्हा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,यशदा पुणेचे संचालक IAS अधिकारी बबन जोगदंड,अंकूश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड (शहर) दिपकभाऊ साठे सामाजिक कार्यकर्ते, सायलीताई साठे, संदिप भंडारी सामाजिक कार्यकर्ते, देविका चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, शर्वरी पवार अध्यक्ष- हुमन राईटस् महा.राज्य, दशरथ एन.सुरडकर -मुख्य संपादक साप्ताहिक आपले ज्ञानपंख” (औरंगाबाद), जयश्री सोनवणे (पुणे) उपसंपादक – “साप्ताहिक आपले ज्ञानपंख”, जुनियर रजनीकांत, जुनियर अमिताब बच्चन, मराठी अभिनेत्री ज्योती डोळस, अभिनेत्री पिंन्कीजी, दादाराव आढाव ( संपादक- जन महाराष्ट्र) अनिल भालेराव (संपादक- साप्ताहिक काय चाललंय),
विश्वास मोरे (उपसंपादक दै. लोकमत), रेश्मा लोखंडे (शिंदे) (संपादक- साप्ताहिक आकस्मिक ),
ईत्यादी मान्यवरांनी व्यासपिठावर आपली प्रमुख उपस्थित दर्शवली.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन‌‌ करुन‌ दिवंगत दुरदर्शन पत्रकार प्रदीप भिडे यांना सामुदायिक आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन “द जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदासभाऊ ताटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लुनेश्वर भालेराव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शाम चक्रनारायण, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष सोनाली वाघमारे, महा. प्रदेश कायदेशीर सल्लागार अँड . अनिल पवार, महा. प्रदेश महा सचिव राकेश पगारे, हयांनी हा सोहळा “न भूतो न भविष्यती” असा झाला पाहिजे हाच संकल्प करून अंत्यत्य शिस्तित पार पाडन्या साठी अथक परिश्रम घेतले, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात काम करणारे उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर,वकील,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, सिने कलाकार,उद्योजक,आरोग्य दुत,आरोग्य सेविका,शिपाई यांनी कोरोना कार्यकाळात उल्लेखनीय कार्य करुन एकप्रकारे समाजा समोर आदर्श निर्माण केला म्हणून “द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली या देशपातळीवर कार्यरत असणा-या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याच वेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हनुन रेश्मा लोखंडे ( शिंदे ) यांना जवाबदारी सोपवन्यात आली तसेच कला क्षेत्रात वकोरोना काळातील कार्य पाहून त्यांना हि संघटनेच्या वतीने पुरस्कार महाराष्ट्राचे अध्यक्ष रामदासजी ताटे सर व मान्यवरां कडून या वेळी प्रदान करन्यात आला*
पुरस्काराचे स्वरुप गौरवचिन्ह सन्मान पत्र असे होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “पुणे चिंचवड येथे “द जर्नलिस्ट असोसिएशनचा अभूतपूर्व कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!