नितिमाण नितीनमुळे सिंधुबाईच्या अंधारलेल्या आयुष्यात उजळली आनंदाची पणती मोडकळीस आलेल्या नारळी येथील वारकड कुटुंबास नितीन भुतडा यांनी दिले कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन.. राजकारणातील पारदर्शी व्यक्तिमत्वाची अनोखी समाजसृजनशीलता

youtube

नितिमाण नितीनमुळे सिंधुबाईच्या अंधारलेल्या आयुष्यात उजळली आनंदाची पणती

मोडकळीस आलेल्या नारळी येथील वारकड कुटुंबास नितीन भुतडा यांनी दिले कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन..

राजकारणातील पारदर्शी व्यक्तिमत्वाची अनोखी समाजसृजनशीलता

उमरखेड प्रतिनिधी-/ आयुष्याचं गणित तसं अवघडच असते. प्रत्येकजण आपापल्या परीने बेरीज वजाबाकी करीत जीवनाचे गणित सोडविण्याचा प्रयत्न करतो. मात्र कधी कधी अचानक काही वादळं येतात आणि सारे काही कोलमडून पडते. असाच काहीसा प्रकार नारळी येथील सिंधूबाई वारकड यांच्या सोबत घडला.
सिंधूबाई वारकड ह्या नारळीत नाल्याकाठी गोळ्या, बिस्कीट, वेफर्सचे सारखे दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे साहित्य विक्रीचे छोटेखानी दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवायच्या.
दरम्यान दि 16 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. ज्यात संपूर्ण गाव जलमय झाले. होत्याचे नव्हते झाले. त्यात सिंधुबाईचे उदरनिर्वाहचे दुकानबपूर्णतः वाहून गेली.
छोट्याशा दुकानाच्या भरवशावर 5 मुलींसह संसाराचा गाडा ओढणाऱ्या सिंधूबाई उन्मळून पडल्या. आता काय करायचे..? आणि कसे जगावे असा प्रश्न पडला…?
5 मुलींचे शिक्षण उदरनिर्वाह, संसाराचा गाडा कसा चालवायचा या चिंतेने त्या खचून गेल्या होत्या. उमरखेड-महागाव मतदारसंघातील दयेचा पाझर, जनसामान्यांच्या आशेचा किरण असलेले भाजपा, यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक श्री नितीन भुतडा हे अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करीत असताना सिंधूबाई यांनी त्यांची भेट घेतली. सिंधूबाईंनी आपबीती कथन करीत हंबरडा फोडला. कुटुंबांचे आभाळ फाटल्याची कैफियत मांडली. आता काय करावं आणि कसं जगावं? लेकरांना काय खाऊ घालावं? कस शिकवावं असे मन सुन्न करणारे प्रश्न मांडले.
सृजनशील मनाच्या नितीन भुतडा यांनी त्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यांना धीर दिला. त्यांच्या कु हर्षदा गजानन वारकड वय 8 वर्ष , तेजस्विनी गजानन वारकड 9 वर्ष, संजीवनी गजानन वारकड 13 वर्ष, गायत्री गजानन वारकर 15 वर्षे आणि टीना गजानन वारकड 16 वर्ष या मुलींनाही धीर देत चिंता करू नका हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, आपण सर्व व्यवस्थित करू असे आश्वस्त केले. आणि जवळपास 1 लाख रु किमतीचे लोखंडी दुकान बनवून दिले व लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर त्या दुकानात सर्व माल भरून देत रीतसर उद्घघाटन केले. त्याच बरोबर त्यांची दिवाळी देखील चांगली व्हावी या करिता पाचही मुलींना कपडे, सिंधुबाईना कपडे, सासुला कपडे दिवाळी निम्मित फराळ मिठाई व फटाके सुद्धा कुटुंबाला दिले.
नितिन भुतडा यांनी एका अंधारलेल्या आयुष्यात तेजाची, उमेदीची पणती पेटविली. याचं पणतीच्या प्रकाशाने वारकड कुटुंबीयांमध्ये चैतन्य संचारले. खऱ्या अर्थाने दीपोत्सव नारळीवासियांना अनुभवण्यास मिळाला. भुतडा यांच्या संवेदनशील स्वभावाची यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रचिती आली. यापूर्वी देखील हेलीकॉप्टर बनवून देशास समर्पित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याच हेलिकॉप्टर ची ट्रायल घेतांना अपघाती दगावलेल्या फुलसावंगी येथील मुस्लिम समुदायातील मुन्ना उर्फ रंचोच्या परिवारास भुतडा यांनी 5 लाखांची मदत दिली होती. अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व देखील त्यांनी घेतले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून 11 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली. त्यांच्या जन्मदिनी अनेक अपंग व्यक्तींना ई रिक्षा देऊन अनेकांचे अपंगत्व दूर केले.
नितीनभाऊंच्याच मार्गदर्शनात सहस्त्रबाहु चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो गरजूंना मोफत औषध पुरवठा नियमितपणे केल्या जातो.
आशा सृजनशील मनाच्या नितीन भुतडा यांच्या संवेदनशील कामाची चर्चा सर्वदूर पर्यंत होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!