लाकडे रोवण्यावरून झालेल्या वादात तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला जामा मस्जिद वार्डातील घटना
लाकडे रोवण्यावरून झालेल्या वादात तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला जामा मस्जिद वार्डातील घटना
उमरखेड : – खुल्या सरकारी जागेवर रोवलेली लाकडे का उपटून फेकली यावरून चार दिवसांपूर्वी आरोपींसोबत झालेल्या वादाचे पर्यावसान तलवारीने प्राणघातक हल्ल्यात झाल्याची घटना दि 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजताचे सुमारास घडली असून या हल्ल्यात तिघे जण गंभीररित्या जखमी झाले असून फिर्यादी शेख आवेद शेख आसद रा जामा मस्जिद वार्ड याचे तक्रारीवरून उमरखेड पोलीस स्टेशनला तिघाजणांविरुद्ध विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शेख आवेश रा. जामा मस्जिद वार्ड याचे कुटुंबात आई वडील लहान भाऊ व त्याचे काका व दोन चुलत भाऊ असा परिवार आहे . याच वार्डात राहणारे आरोपी नामे अलीमोद्दीन अब्दुल रऊफ , शेख मोबीन अब्दुल रऊफ , नदीम अब्दुल रऊफ यांचे सोबत फिर्यादीचा चुलत भाऊ वसीम याने लेंडी जवळील खुल्या सरकारी जागेत गाय बांधण्यासाठी तीन लाकडे (बल्ली ) रोवली होती . ती आरोपींनी उपटून फेकून दिली यावरून 4 दिवसांपूर्वी आरोपी व फिर्यादीमध्ये शाब्दीक वाद झाला होता तेव्हा आज दि . 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादीचा चुलत भाऊ शेख वसीम शेख रफीक यास आरोपींच्या घराजवळ तिन्ही आरोपी खाली पाडून लाथा बुक्क्यांनी तसेच तलवार खंजीराने बेदम मारहाण करीत असल्याचे दिसून आले तेव्हा फिर्यादीचा लहान भाऊ नामे शाहरुख व फिर्यादी शेख आवेश तेथे रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या भावाला सोडविण्यासाठी गेला असता आज मारूनच टाकतो असे ओरडत तिन्ही आरोपींनी वसिमच्या पोटावर , मांडीवर , खांद्यावर तलवारीचे सपासप वार केले व फिर्यादीचा लहान भाऊ शाहरुख याचेवर केलेल्या तलवारीच्या वारात बोटाला गंभीर दुखापत झाली व फिर्यादी यासही बेदम मारहाण झाली . यावेळी आरोपींनी जखमीच्या मोटर सायकलची तोडफोड करून घरासमोर पथराव केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलीसांनी आरोपी अलीमोद्दीन अब्दुल रऊफ , शेख मोबीन अब्दुल रउफ , शेख नदीम अब्दुल रउफ रा. जामा मस्जिद वार्ड यांचे विरुद्ध भादंवि 323, 3 26 , 324 , 307 , 427 (34) नुसार गुन्हा दाखल केला आहे . पोलीस पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली एपी आय निलेश सरदार पोकॉ गीते करीत आहेत .
Real wonderful info can be found on blog.Expand blog