मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे.
उमरखेड तालुक्यातील मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे खेड्या वरून प्रसूती साठी आलेल्या महिलेने डॉक्टर दवाखान्यात येण्याच्या आधीच दिला गोंडस मुलीला जन्म.
उमरखेड…
ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुळावा गावची या गावच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष खडसे ताई, माजी आमदार विजय खडसे, तसेच माझी बांधकाम सभापती तातु पाटील देशमुख तसेच सध्याचे उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे तसेच सध्याचे धडाडीचे जिल्हा परिषद सदस्य चितंगराव कदम सर इतके मातब्बर नेते असतानाही या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी हजर राहत नाही ही एक शोकांतिका आहे मुळवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास पंचवीस ते तीस खेडी आहेत या दवाखान्यांमध्ये अनेक कर्मचारी असून ते बाहेर गावावरून येणे-जाणे करतात अशातच काल धनज येथील महिला संगीता कोंडबा ढेंबरे ही तिच्या वडीला सोबत मुळवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रायव्हेट वाहन करून आले असता या दवाखान्यात प्रसूती दरम्यान एकही डॉक्टर हजर नसल्याचे दिसून आले त्यानंतर तीच्या वडीलांनी स्वतः स्ट्रेचर आणून त्या महिलेला आत मधे नेले त्या ठिकाणी सोबत आलेली आशा सेविका चिटमाडे होती डॉक्टर येईपर्यंत त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला तोपर्यंत कोणीही हजर नव्हते एकीकडे प्रशासन लाखो रुपये खर्च करून डॉक्टर नर्सेस दवाखान्यात ठेवत आहे परंतु कर्मचारी त्याठिकाणी हजर नसल्यामुळे चिंतेची बाब वाढली आहे सध्या गावागावात डेंग्यूची साथ, तापीची साथ एवढी समस्या मोठी असताना एकही कर्मचारी हजर राहत नाही यावर यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब या डॉक्टर वर काय कारवाई करतात याकडे मुळावा वासियांचे तसेच उमरखेड वासीयांचे लक्ष लागले आहे.