मेट येथील दोन नायका मध्ये पार्टिशन बैल पोळा शांततेत पार पडले मेट प्रतिनिधी – संदीप जाधव
मेट येथील दोन नायका मध्ये पार्टिशन बैल पोळा शांततेत पार पडले
मेट प्रतिनिधी – संदीप जाधव
यवतमाळ जिल्हा च्या टोकाला असलेले मेट या गावां मध्ये दोन नायका मध्ये पार्टिशन असून सुद्धा साडेसातशे घरांची वस्ती आहे या गावांमध्ये नायक दोन आहे. त्यामुळे पोळा सण यानिमित्ताने एकत्र बैलपोळा न साजरा करता पोलीस प्रोटेक्शन व ठाणेदार सुजाता बनसोड यांनी दोन्ही नायकांना वेगवेगळे टाइमिंग देऊन हा सण शांतता वातावरणात साजरा करण्यात आला,कुठल्याही प्रकारचे दगंल न होऊ देता पोलीस बंदोबस्त. शिस्तबद्ध पद्धतीने बैल पोळा सण साजरा केला. शेतकऱ्यांचा आधार स्तंभ ज्याच्या बळावर शेतीची मशागत करून शेतामध्ये राब राब राबतो त्यांना सजवून बैलपोळा म्हणजे बारा महिन्याचा एकमेव सण या सणांमध्ये सर्व बैलांना एकत्र करून मारोती मंदिराजवळ पार्वती शंकर ह्यांच्या लग्नामध्ये सर्व सेतकरी व बैलांची उपस्थिती ठेवून विवाह सोहळा मंगलाष्टका द्वारे पार पाडल्या जाते. यामध्ये उपस्थित मान्यवर श्री राम कनीराम राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री सुरेश बळीराम राठोड नायक, असामी श्री शामराव किसन चव्हाण, कारभारी श्री उत्तम सवयी राठोड व सर्व गावकरी मंडळ उपस्थित होते.