गुरू रविदास यांचा विचार आणि प्रतिमा घरोघर गेल्याशिवाय परिवर्तन होणार नाही इंजिनियर देगलूरकर.

youtube

ढाणकी (प्रतिनिधी) : क्रांतिकारी महामानव गुरु रविदास, फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम यांचा विचार आणि प्रतिमा घरोघर गेल्याशिवाय चर्मकार समाजात परिवर्तन होणार नाही असे विचार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी मांडले.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे गुरु रविदास तैलचित्र प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप प्रसंगी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. नगर पंचायतचे उपाध्यक्ष शेख जहीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.
देगलरकर यांनी मनले समता परिषद ही कार्यकर्ता घडविणारी कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत घडलेले आमचे पुणे जिल्हा प्रमुख हरिभाऊ खंदारे हे सतत कांहीं ना कांहीं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात, ज्यामुळे संघटनेचा प्रचार – प्रसार होत असतो. गुरु रविदास महाराजांच्या दोन सुंदर प्रतिमा त्यांनी प्रकाशित केल्या. प्रतिमा आणि विचार घरोघर पोहोचविणे ही आता तुमची जबाबदारी आहे.
क्रांतिकारी महामानव गुरु रविदास यांच्या प्रतिमे बरोबरच म. जोतिबा फुले, राजर्षी शाहू राजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, मान्यवर कांशीरामजी यांचेही विचार आणि प्रतिमा घरोघर गेल्याशिवाय चर्मकार समाजात परिवर्तन होणार नाही. चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.
पुणे जिल्हा प्रमुख हरिभाऊ खंदारे यांनी ही आपले विचार मांडले.ओमा पाटील चंद्रे, नगरसेवक संबोधी गायकवाड, जॉंटी विणकरे, समाधान राऊत. नगराध्यक्ष सुरेश लाला जयस्वाल .जहीर भाई उप अध्यक्ष तसेच शाखा प्रमुख ढाणकि चे गजानन सुरोशे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण भरणे यांनी केले. शेवटी विष्णू सुरोशे यांनी आभार मानले.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद ढाणकी शाखा अध्यक्ष गजानन मारोती सुरोशे, उपाध्यक्ष परमेश्वर प्रकाश पाचकोरे, सचिव दत्ता भीमराव कांबळे, सहसचिव संभाजी मुकिंदा परतुडे, संघटक संजय ज्ञानोबा परतुडे, सहसंघटक रामकृष्ण मारोती सुरोशे, कोषाध्यक्ष आकाश विश्वंभर गायकवाड, सहकोषाध्यक्ष विष्णू संभाजी सुरोशे, सल्लागार प्रभाकर राघोजी वाघमारे, सहसल्लागार नारायण जळबा परतुडे. सदस्य गजानन सुभाष डोंगरे, शिवाजी मारोती सुरोशे, चांदू उत्तम सुरोशे तसेच
युवा कार्यकारिणीचे अध्यक्ष दिपक बंडू सुरोशे, उपाध्यक्ष करण कामाजी परतुडे, सचिव सुरज परमेश्वर सुर्यवंशी, सहसचिव अक्षय डोंगरे, संघटक ऋतिक गणेश गायकवाड, सहसंघटक गजानन बबन परतुडे, कोषाध्यक्ष प्रसाद संभाजी परतुडे, सहकोषाध्यक्ष ऋषी विजय कांबळे, सल्लागार दत्ता तानाजी वाघमारे, सहसल्लागार ज्ञानेश्वर बबन परतुडे तसेच सल्लागार ज्ञानेश्वर संभाजी डोंगरे आणि गणेश उत्तम सुरोशे यांची उपस्थिती होती. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!