दुचाकीस्वार शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून 3 लाख 20 हजार रोख रक्कम हिसकावले.

youtube

दुचाकीस्वार शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून 3 लाख 20 हजार रुपये हिसकावले

निंगनूर घाटातील घटना

प्रतिनिधी निंगनूर :

फुलसावंगी येथून व्यापाऱ्या कडून कापूस व भुसार विक्रीचे पैसे घेऊन दुचाकीने निंगनूर येथे परत येत असतांना दुचाकीने पाठलाग करणाऱ्या अज्ञात दोन इसमांनी निंगनूर घाटात दुचाकी अडवून डोळ्यात मिरची पूड फेकून शेतकरी गणेश भिकू राठोड यांचे जवळील 3 लाख 20 हजार रुपयाची रोख रक्कम हिसकावून दोन्ही आरोपी फुलसावंगीकडे पसार झाल्याची घटना दि. 24 मार्च रोजी रात्री 9 वाजताचे सुमारास घडली आहे .
याबाबत फिर्यादी गणेश राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिटरगांव पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 392 ( 34 ) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मस्के , बीट जमादार गजानन खरात, पो. कॉ . दत्ता कुसराम करीत आहेत .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!