विद्युत प्रवाहाचा झटका लागुन युवकाचा मृत्यु

youtube

विद्युत प्रवाहाचा झटका लागुन युवकाचा मृत्यु

नमो महाराष्ट्र

मुळावा प्रतिनिधि
पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे माळआसोली येथील युवक शरद राठोड वय ३० हा युवक ग्रा.प.च्या पाणी पुरवठा योजनाच्या कामावर रोजनदारीने काम करीत होता.नेहमी प्रमाणे तो कामावर गेला असता सोमवारी संध्याकाळी ५.३० दरम्यान नळ योजनाच्या मोटरपंपाची लाईन गेल्या मुळे तो पाहण्यासाठी गेला होता.डिओ गेल्याचे शरद च्या लक्षात आल्याने त्याने डिओ टाकण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन कार्यालयात फोन लावुन कळविले असाता विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. पण डिओ टाकण्याच्या आधीच विद्युत कंपनीच्या सबस्टेशन मधुन कुणीतरी विद्युत प्रवाह चालु केला त्यामुळे डिओ टाकण्यासाठी गेलेल्या शरदला विद्युत प्रवाहाचा जबर झटका लागला आणि शरद खाली कोसळला त्यामुळे त्याच्या डोक्याला
जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला ताबडतोब पुसद येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.पण येथील डॉक्टर ने त्याला मृत घोषित केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!