पुसद येथे महा आक्रोश मोर्चा हजारो संख्येने आमदार इंद्रनील नाईक यांना बंजारा बांधवांनी.मोर्चेतुन हकलुन लावले..
पुसद येथे महा आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने उसळला जनसागर
गोर सेनेचे आवाहनाला समाजबांधवांनी दिला प्रतिसाद
पुसदच्या चारही महामार्गावर नाकाबंदी
आमदार इंद्रनील नाईक यांना मोर्चेकऱ्यांनी दाखविला घरचा रस्ता
पुसद –
काळी येथील मृतक शाम शेषराव राठोड व पिढीत लक्ष्मण शेषराव राठोड यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाआक्रोश मोर्चाचे दि.१७ डिसेबर रोजी गोर सेनेच्या वतीने आयोजन केले होते.पुसद येथे मोर्चात सर्व समाज बांधवानी सुमारे १५ ते २० हजारांच्या संख्येने उपस्थित राहून गगनभेदी आवाजात घोषणाबाजी केली.मृतक शाम राठोड याच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व फाशी व्हावी अशी मागणी गगनभेदी आवाजात करण्यात येत होती .पुसद येथील कारला रोडवरील वसंत उद्याना पासुन सकाळी ११.३०वाजता निघालेल्या मोर्चात हजारो समाजबांधवांनी सहभाग नोंदविला होता.
पुसद शहरात कलम 144 लागू असुनही व शहराच्य सर्वच सीमा रात्री पासूनच बंद करून जागोजागी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते तरीसुद्धागावात रात्रीच्या वेळेस गाड्या फिरवून उद्या होणाऱ्याय मोर्चात सामील न होण्याचे आवाहन करण्यात येत होते आणि प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या बद्दल,राजकीय अफवा पसरविण्यात येत होत्या ,परंतु गावागावातील बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन ,मोर्चात सामील होण्यासाठी समाज बांधवांना आवाहन केले.विशेष करून माळ पठारावरील 42 गावात व वाशीम जिल्ह्यातील काही गावात रोहडा येथील चंदू दामला राठोड यांनी मोर्चात सामील होण्याचे समाज बांधवांना आव्हान करून ,एकत्र जमविण्याचे काम केले.त्यामुळे स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी पुसद शहराच्या दिशेने जमा झाले होते. उसळलेल्या जनसमुदाने नियम पायदळी तुडवीले होते.गोर सेनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महा आक्रोश मोर्चाने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
महागाव तालुक्यातील मौजे काळी (दौ.) येथे मृतक शाम शेषराव राठोड यांची दि. ०३ डिसेंबर २०२१ रोजी किरकोळ कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतकांचा भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यावरही चाकुने हल्ला करण्यात आला होता.घटनेतील आरोपींनी केलेल्या कृत्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळावी व पिढीत कुटूंबाला न्याय मिळावा या मागण्यासाठी महा आक्रोश मोर्चाचे आयोजन दि.17 डिसेंबर रोजी गोर सेनेच्यावतीने करण्यात आले होते. मोर्चाच्या माध्यमातून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालाविण्यात यावा. या करिता निष्णात सरकारी वकीलाची नेमणूक करावी.
पिढीत कुटूंबाला मदत म्हणून २५ लाख रुपयाची तात्काळ शासनानी मदत करावी व कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी. विमुक्त जाती भटक्या जमाती समुदायाला अॅट्रासिटी प्रमाणे संरक्षण देण्यासाठी कायदयात स्वतंत्र तरतूद करावी.यासह इतर मागण्यांच्या संदर्भात दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनासह पायदळ जमा झालेल्या समाजबांधवांनी वसंत उद्यान ते बसस्टँड, छत्रपती शिवाजी चौक, सुभाष चौक, आंबडेकर चौक, मुखरे चौक, मार्गे मोर्चाला सुरूवात करीत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला सामाज बांधवांकडून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सामाज बांधवांना गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी मार्गदर्शन करीत आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.मोर्चात झालेली गर्दी पाहून उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी वसंतराव नाईक चौकातच आंदोलनकर्त्यांन जवळून निवेदन स्वीकारले. एका महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.स्व. मुखरे चौकात किरकोळ झालेली गोटमार वगळता ११.३०वाजत सुरु झालेला मोर्चा दुपारी १.४०वाजता शांततेत विसर्जित झाला.
पुसद शहराला असे मिळाले छावणीचे स्वरूप
पुसद शहरात समाजबांधवांकडुन गोर सेनेच्या नेतृत्वाखाली महा आक्रोश मार्चा निघणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यामुळे पुसद येथे दि.16 डिसेंबर रोजीच बीड, अमरावती, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा,हिंगोलीसह उमरखेड येथुन पोलीस बंदोबस्त पोलीसांच्या तुकड्या मागविण्यात आल्या होत्या.त्यामध्ये 12 डिवायएसपी,57 ठाणेदारासह 4 हजार 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता. सोबतच पुसद विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारीसह सर्वच पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.शहरातील सिमेवर नाका बंदी करण्यासाठी देखील पोलीस तैनात करण्यात आले होते.शहरात निघणाऱ्या मोर्चात सामील होण्यासाठी तालुक्यातील गावांसह इतरही जिल्ह्यातील तसेच परराज्यातून समाज बांधव मोर्चात मोठ्या प्रमाणात सामील होण्यासाठी पायदळी, दुचाकी व चारचाकी वाहनाने राञीपासूनच निघाले होते.परंतु नाका बंदी दरम्यान त्यांना अडविण्यात आले होते.मोर्चात सामील होणा-यां सुमारे १५०० कार्यकरत्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
चौकट
आ.ईंदनिल नाईक यांना मोर्चेकऱ्यांनी आल्या पावली परत पाठविले
सकाळी निघालेला मोर्चा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून गोर सेनेचे अध्यक्षासह इतर पदाधिकार्यांची भाषणे झाली.त्यानंतर पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक हे मोर्चात सामील होऊन सभा स्थळी मार्गदर्शन करण्यासाठी आले असता मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना आल्या पावली परत पाठविले. बंजारा समाजावर प्रचंड वर्चस्व असलेल्या नाईक घराण्याचे आमदार इंद्रनील नाईक यांना मोर्चे कऱ्यांच्या प्रचंड रोषामुळे सभा स्थळावरून परत जाण्याची वेळ आल्याने नाईक घराण्यावर प्रचंड नामुष्कीची वेळ आली होती.