राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी पुतळ्यासमोरिल 51 हजार फोटो बीड च्या वतीने प्रसारित करणार – प्रकाश भैय्या सोनसळे

youtube

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोरील ५१००० हजार फोटो बीडच्या वतीने प्रसारित करणार.
-प्रकाश भैय्या सोनसळे
बिड…

अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले.राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहि अभिवादन सभेचा आजचा चौथा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले. सर्वांच्या उपस्थितीत अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्वजन प्रयत्न करू बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा श्री संतोष वाळके ,डी .वाय. एस .पी बीड, सखाराम गोरे ,सरपंच भानकवाडी व यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा श्री.डॉ.सुरज भावले यांच्याक्षहस्ते करण्यात आले.सी. डी .एस कमांडर जनरल शाहीद विपिन रावत यांच्या प्रतिमेस मानवंदना देताना मा श्री.संतोष वाळके डी. वाय एस. पी .बीड, धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम सरसेनापती प्रकाश भैय्या सोनसळे, डॉ.सुरज भावले,शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा बीड जिल्हाध्यक्ष सुभाष गुंजाळ कोषाध्यक्ष. साळुंके मोहळकर साहेब यांच्या उपस्थितीत मेणबत्ती पेटवुन पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लोकनेते स्व .गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करतांना श्री.मा.संतोषजी वाळके. डी वाय. एस .पी. बीड, गणेश सानप ज्ञानसागर गुरूकुल बीड यांच्या शुभहस्ते करण्यात आले
अहिल्याबाई होळकर पुतळा साप्ताहिक पुजन,महाराजे यशवंतराव होळकर साप्ताहिक प्रतिमा पूजन ,सी डी एस कमांडर जनरल विपिन रावत व त्यांच्या पत्नी सहित १२ जवान शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, लोकनेते स्वा गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले
प्रकाश भैय्या सोनसळे यांनी आज एक संकल्प केला आहे धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्याच्या वतीने आपन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अभिवादन सभेतून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सर्वांनी अभिवादन केलेले ५१००० हजार फोटो काही दिवसात पूर्ण करूत असे प्रकाश भैय्या सोनसळे यांनी समाज बांधवांना संबोधित करताना सांगितले व यासाठी आपन सर्वांच्या साक्षीने सांगतो की मला सहकार्य करा मला साथ द्या पदरात पाडून आणि या लढ्यास आज पासून सर्वजन कामाला लागु असे बोलताना सांगितले.
यावेळी प्रमुख मा.श्री.संतोषजी वाळके साहेब डी वाय एस पी बीड, मनोज सिराम सर संस्थापक अध्यक्ष-धनगर समाज युवा मल्हार सेना, प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना , पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती,सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडले.सूत्रसंचालन माजी सैनिक माने आभार प्रदर्शन डॉ किरण सोनसळे यांनी केले.

Google Ad
Google Ad

1 thought on “राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी पुतळ्यासमोरिल 51 हजार फोटो बीड च्या वतीने प्रसारित करणार – प्रकाश भैय्या सोनसळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!