यशवंत विद्यार्थ्यांचे आजचे रूप म्हणजे अभ्यासिकेच्या श्रमाचे फळ होय – तातू देशमुख

youtube

यशवंत विद्यार्थ्यांचे आजचे रूप म्हणजे अभ्यासिकेच्या श्रमाचे फळ होय – तातू देशमुख

उमरखेड :- आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा प्रत्येक गावात अभ्यासिका असणे ही काळाची गरज झाली आहे या अभ्यासिकेत अभ्यास करूनच आज विद्यार्थी दशेतून अधिकारी घडलेले मी पाहत आहो असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातू देशमुख यांनी केले. ते यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या वतीने आयोजित यूपीएससी एमपीएससी व तत्सम परीक्षेच्या माध्यमातून विविध प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव शितल वातीले, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे , तहसीलदार आर. यु. सुरडकर , महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य ऍड.आशिष देशमुख, साहेबराव कांबळे, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर , सचिव डॉ. या. मा. राऊत, उपाध्यक्ष संभाजी नरवाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात यू.पी.एस.सी. एम.पी.एस.सी. तसेच तत्सम परीक्षेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व सामान्य प्रशासनात कार्यरत 18 अधिकारी वर्गाचा सहपरिवार सन्मान करण्यात आला. तसेच आपला संकल्प ‘गाव तिथे अधिकारी” या संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या माध्यमातून तसेच कोरटा, चातारी, साखरा, पोफाळी, वाकोडी, खंडाळा या सात अभ्यासीकेतून 30 विद्यार्थ्यांची विविध पदावर नियुक्ती झाल्याबद्दल यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या वतीने अधिकारी वर्गांचा कुटुंबासह गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अभय जोशी , प्राध्यापिका डॉ. के. डी. बोंपीलवार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद एम. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळींनी परिश्रम घेतले.

Box
स्वप्न सत्यात उतरत असल्याचा आनंद – राम देवसरकर

तालुक्यातील प्रत्येक गावात अधिकारी निर्माण व्हावा याकरिता रामसेतू या नावाने स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी करीता तालुक्यात विविध ठिकाणी 30 च्या वर अभ्यासिका उभ्या केल्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायदा होऊन गाव तिथे अधिकारी आणि घर तिथे कर्मचारी निर्माण व्हावा असे स्वप्न उराशी बाळगले होते. आज दोन वर्षानंतर तब्बल 50 च्या वर विविध पदावर अधिकारी निर्माण झाले त्यांचा सत्कार करताना आनंद होत आहे असे मनोगत यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चे सिनेट सदस्य राम देवसरकर यांनी “सन्मान यशवंतांचा ” कार्यक्रम प्रसंगी मनोगतामधून व्यक्त केले.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “यशवंत विद्यार्थ्यांचे आजचे रूप म्हणजे अभ्यासिकेच्या श्रमाचे फळ होय – तातू देशमुख

  1. Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article

  2. Thanks, I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far. However, what in regards to the bottom line? Are you certain in regards to the supply?

  3. I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard info a person supply on your guests Is going to be back incessantly to investigate crosscheck new posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!