महाआरोग्य शिबीरात १०१६ रुग्णांवर उपचार तर १६२ रुग्णांवर सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्य स्तुत्य उपक्रम

महाआरोग्य शिबीरात १०१६ रुग्णांवर उपचार तर १६२ रुग्णांवर सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार
नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्य स्तुत्य उपक्रम
उमरखेड प्रतिनिधी-
भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक तथा पश्चिम विदर्भ सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख नितीन भुतडा यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णाल्य सावंगी (मेघे ) यांच्या सहकार्यातून रविवार ९ मार्च रोजी साकळे विद्यालय येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन नितीन भुतडा मित्र परिवाराकडून आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तब्बल ७५ डॉक्टरांचा समावेश होता .
या शिबिरामध्ये १०१६ रुग्णांवर उपचार करून त्यांना औषध वितरण करण्यात आले. तसेच शस्त्रक्रियेसाठी १६२ रुग्णांना मेघे सावंगी येथे १२ मार्च रोजी आयोजका कडून पाठविण्यात येणार आहे .करण्यात आले.
या आरोग्य शिबिरांमध्ये मनुष्याच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या आजाराचे उपचार करण्यासाठी सांगवी मेघे येथील रुग्णालयातील डॉक्टरांची टिम उपस्थित होती त्यामध्ये डॉ.एन.पी.शिंगने रुग्ण संपर्क अधिकारी व डॉक्टर वसंत वाघ, डॉक्टर तुषार नागतोडे, डॉ. सई भवानी, बालरोग तज्ञ, डॉ. शिव जाधव अस्थिरोग तज्ञ, डॉ. आकाश दोषी मुखरोग तज्ञ या सर्वांनी या शिबिरामध्ये सेवा दिली. या शिबिराचे उद्घाटन नितीन भाऊ भुतडा व आमदार किसन वानखेडे माजी आमदार नामदेव ससाने यांनी फित कापून केले. यावेळी मंचावर साकळे विद्यालयाचे व्यवस्थापक अंबादास साकळे , जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर , भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते , माजी आमदार विजय खडसे , माजी जि . प . अध्यक्ष रमेश चव्हाण , बालाजी उदावंत, ॲड . अस्मिता आढाव , सविता पाचकोरे ,डॉ आशिष साकळे, भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार , डॉ . किशोर कपाळे , तालुका वैधकीय अधिकारी डॉ . चंदा डोंगे व सावंगी मेघे येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडूरंग गायकवाड प्रास्ताविक डॉ. धनंजय व्यवहारे तर आभार अतुल खंदारे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेकरिताb अमोल व्हडगिरे, पंकज कदम, अश्विन कणावार,अनिकेत साकळे,पवन मेंढे, गजानन मोहळे, सागर कनावार,ऍड. जितेंद्र पवार, बबलू मैड, अभिजीत कऱ्हाळे, श्रीकांत कळसे, संतोष बोडखे,सोनू मैड यांचेसह नितीन भुतडा मित्र परिवारातील असंख्य कार्येकर्त्यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स–
ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय तपासणीचा फायदा व्हावा व त्यांच्या आजाराचे योग्य निदान व्हावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले आहे. तसेच मागील काही वर्षापासून महिलांमध्ये दुर्धर आजाराचे प्रमाण वाढले असून त्यांचे निदान व शस्त्रक्रिया व्हाव्यात म्हणून दर तीन महिन्यातून एक वेळेस आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे .
नितीन भुतडा
भाजपा जिल्हा समन्वयक