उमरखेड तालुक्यात विविध ठिकाणी तुळशी विवाह उत्साहात संपन्न उमरखेड प्रतीनीधी:-
उमरखेड तालुक्यात विविध ठिकाणी तुळशी विवाह उत्साहात संपन्न
उमरखेड प्रतीनीधी:-
उमरखेड, दि. 13 : हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशी विवाह सोहळ्याचा तालुक्यातील विविध ठिकाणी भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गावागावांमध्ये तुळशीचे पवित्र वृंदावन सजवून, फुलांनी व रांगोळ्यांनी मांडव आकर्षकपणे सुशोभित करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने तुळशी आणि भगवान श्रीकृष्णाचा विवाह विधी संपन्न झाला. महिलांनी मंगलाष्टकांचे गायन करून वातावरण भक्तिमय केले, तर तरुण व मुलांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
तालुक्यातील उमरखेड,ढाणकी , इसापूर, पिंपळवाडी,
फुलसावंगी यासारख्या गावांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येऊन सामूहिक तुळशी विवाहाचे आयोजन केले. काही ठिकाणी तुळशी विवाहानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांत या सणाचे महत्त्व वाढले असून, पर्यावरण रक्षणासाठी तुळशीच्या रोपांचे वाटपही अनेक गावांमध्ये करण्यात आले. तुळशी विवाहाच्या निमित्ताने धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या उपक्रमांचे ईसापूर येथील आवधूत मारकवार यांच्यासह परिवाराचे आयोजनही कौतुकास्पद ठरले.
या सोहळ्यामुळे तालुक्यात भक्ती, सौहार्द, आणि उत्साहाची वातावरण तयार झाली असून, या मंगलमय पर्वाचा प्रत्येकाने आनंद लुटला.
Baddiehub very informative articles or reviews at this time.
Packachange This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!
Sırapınar su kaçak tespiti Evimdeki su kaçağı sorununu hızlıca çözdüler, gerçekten profesyonel bir ekip! https://www.florevit.com/ustaelektrikci